-->

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता

0

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता

ग्रामपंचायतीने सोयी सुविधा पुरविण्याची मागणी

वणी : येथून ७ किमी अंतरावर  तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी ह्या गावात मात्र विद्यार्थी व युवकांसाठी चांगले वाचनालय आणि खेळाचे मैदान नाही. विद्यार्थी व युवकांना चांगले भविष्य घडविण्यासाठी स्वबळावर तयारी करून पुढे जावे लागत आहे. ज्या गावातून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होतो व शासनाचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोरीत पैसा जमा होतो तिथे  देशाचे भविष्य विद्यार्थी, युवकांना मात्र मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष केल्या जात आहे तर लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करीत आहेत.

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता

ग्रामपंचायतीने सोयी सुविधा पुरविण्याची मागणी

राजूर येथे १४ व्या वित्त आयोगाकडून येथील ग्रामपंचायतीने वरील मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सुरू केली. ह्या अभ्यासिकेत एक कपाट व त्यात काही पुस्तके उपलब्ध करून दिली. हळूहळू ह्या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करायला यायला लागली.परंतु त्या ठिकाणी खुर्ची, मेज व पंखे आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध नव्हती. विद्यार्थ्यांनी मागण्या केल्यानंतर तिथे काही खुर्च्या, दोन पंखे व मेज म्हणून  भिंती लगत पातळ प्लायवूड चे काऊंटर तयार करून देण्यात आले. Lack of basic amenities in Dr. Babasaheb Ambedkar College at Rajur

अभ्यासिकेत येणाऱ्या मुलामुलींना होतोय त्रास

सध्याचे घडीला ह्या अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंग, एससीसी, पोलीस व अन्य परीक्षे साठी विद्यार्थी अभ्यासासाठी सकाळी ४ वाजे पासून इथे येतात. परंतु ह्या ठिकाणी योग्य व पुरेश्या खुर्च्या नाहीत, पातळ प्लायवूड चे काऊंटर तुटलेले आहेत, पंखे कमी आहेत, उन्हाळ्यात कुलर नसल्याने प्रचंड गर्मी मध्ये अभ्यास करावा लागतो, विद्यार्थिनी साठी मुत्रिघर नाही तसेच मुबलक पाणी नाही, पिण्यासाठी थंड पाणी नाही, चालू घडामोडी साठी मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके उपलब्ध नाहीत, स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान व रिजनींग साठी पुस्तके नाहीत, अश्या परिस्थितीत विद्यार्थी स्वतः आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार पुस्तकांची व्यवस्था करून या ठिकाणी अभ्यास करीत आहेत.
विद्यार्थी व युवक हा देशाचा कणा असतो व तो देशाचे भविष्य घडवीत असतो. सध्या आपला देश सर्वात जास्त तरुण असलेल्यांचा देश आहे. परंतु ह्या तरुणांच्या देशात त्यांचा भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचा शिक्षणासाठी पर्याप्त व्यवस्था करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कडे वेळ नाही, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी कृती करायला तयार नाहीत. शासनाने नोकर भरती बंद करून ठेवल्याने सध्या नोकरीचा जाहिराती नाहीत. असे असतानाही विद्यार्थी पुढील भविष्याचे स्वप्न बघत मोजक्या व अपुऱ्या साधनात अभ्यास करीत तयारी करीत आहेत. 
अश्या ह्या बिकट अवस्थेत किमान राजूर येथील सरपंच व ग्रामसेवकाने येथील अभ्यासिकेत मूलभूत गरजांची पूर्तता करून देशाचा भविष्यात हातभार लावावा अशी अपेक्षा राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी कडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top