-->

गुप्तधन शोधणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद The money-seeking gang was arrested by the police

0

गुप्तधन शोधणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद 

Sangini News

सद्यस्थितीत गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यातच बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ढाणकी परिसरात गुप्तधन काढत असल्याची माहिती बिटरगाव ठाणेदारांना मिळताच त्यांनी पथकासह सापळा रचून पाच इसमाना जेरबंद केले आहे.The money-seeking gang was arrested by the police.

गुप्तधन शोधणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद The money-seeking gang was arrested by the police

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी शहरात मागील काही दिवसा पासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच दि.10/05/2024 रोजी चे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत असल्याची माहिती बिटरगाव पोलिसांनी लागली. त्या वरून ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामीलावाड यांचे शेतात छापा टाकून 1) जीवन गोविंद जाधव वय 25 वर्षे रा. टेंभुरदरा 2) संतोष हरीसिंग राठोड वय 48 वर्षे रा बाळदी 3) अभिजीत गणेश मामीडवार वय 25 वर्षे रा ढाणकी 4) सर्वजीत कांनबा गंगनपाड वय 25 वर्ष ढाणकी 5) पंडित विश्वनाथ राठोड वय 45वर्ष रा चिल्ली. सर्व ता उमरखेड जि यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून पाच मोबाईल एकूण किंमत 28000/- व तीन मोटरसायकल किंमत- 120000/- , डीप सर्च मेटल डिटेक्टर किंमत 60000/- व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत 500 /- रुपये असा एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व दत्ता कुसराम यांचे फिर्याद वरून वरील आरोपी विरुद्ध अपराध कलम 3(2)3(3) महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला सदर ची कारवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार, पोहेका रवी गिते, पोलीस नायक गजानन खरात,पोका, निलेश भालेराव, अंबादास गारुळे, प्रवीण जाधव, प्रकाश मुंढे, चालक मंगेश हुलगुंडे यांनी केली पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top