-->

चिंचमडळ,चोपन गावात विज कोसळली Lightning struck Chopan village, Chinchamadal

0

चिंचमडळ,चोपन गावात विज कोसळली 

Sangini News


वणी उपविभागात रविवारी दुपारचे सुमारास अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान आकाशात विजेचे तांडव सुरू होते. मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ शिवारात तर चोपन येथील एका घराच्या समोर असलेल्या सुबाभळीच्या झाडावर विज कोसळली. यात चिंचमंडळ येथील शेळी पालकाच्या काही बकऱ्या ठार ‌झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आहे. तर चोपन येथील झाड विजेच्या शॉक ने अक्षरशः ऊभ्या अवस्थेत सुकल्या सारखी झाल्याची घटना घडली आहे. मात्र घराबाहेर कोणीही नसल्याने सुदैवाने जिवित हानि टळली आहे.Lightning struck Chopan village, Chinchamadal
चिंचमडळ,चोपन गावात विज कोसळली वणी उपविभागात विजेचे तांडव




मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या चोपन येथील बंडु खिरटकर यांच्या घरा बाहेर असलेल्या सुबाभळीच्या झाडावर विज कोसळली. या परिसरातील व्यक्ती घराबाहेर नसल्यामुळे अनुचित प्रकार टळला आहे. दुपारी 2 वाजता तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान सुसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. उपविभागात सर्वत्र वातावरण जवळपास सारखेच निर्माण झाले होते. दरम्यान बाहेर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणचा आसरा घेतला होता. मात्र चिंचमंडळ येथील कळसकर हे आपल्या शेळ्या घेऊन शिवारात चारायला गेले होते .परिणामी त्यांच्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडली. यात त्यांच्या शेळ्या ठार झाल्याची माहिती आहे. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस जवळपास एक तास सुरु होता. सध्या जवळपास एक दिवस आड अवकाळी पाऊस हजेरी लावतो आहे. परिणामी अनेकांच्या मंगलकार्यात व्यत्यय येत आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीला लागला असतांना जमीन तापणार कशी असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. या अवकाळी पावसाने कामे खोळंबली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top