घरफोडी करणा-या दोन अट्टल आरोपींना वणी पोलिसांनी केली अटक
सहारा पार्क मधील घरफोडी करणारे गजाआड
Sangini News Wani Yavatmal/
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क मध्ये भरदिवसा घरफोडी झाली होती. त्यांनतर तब्बल तीन महिन्यांनी घरफोडीचे आरोपी वणी पोलिसांना गवसले आहे. यातच पिदूरकर यांचे घरी दरोडा टाकण्यात आला त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष तर होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होते आहे. Wani police arrested two accused burglars
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लालगुडा ग्रामपंचायत हद्दीत पिदूरकर यांचे घरी दरोडा टाकण्यात आला होता. दरम्यान त्याच भागातील दोन दुचाकीची काही क्षणात लंपास झाल्या होत्या. लाखो रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम आणि दस्तऐवज चोरून नेले होते. या गुन्ह्यांचा छडा अद्याप वणी पोलिसांना लागला नाही हे दुर्भाग्यच?
शहरालगत असलेल्या नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथील शकर किसन घुगुल यांचे घरी, दिनांक ०८/०२/२०२४ घरफोडी झाली होती. शंकर घुगुल व पत्नी हे दोघे दार बंद करून कामावर गेले असता सकाळी १०/१५ वा ते ०१/४० वा ने सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे राहते दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १) सोन्याची १,६०,०००/- २) कानातले दोन सोन्याचे रिंग २ ग्राम कि८,०००/५०००/- असा एकूण १०३,०००/- मुददेमाल चोरून नेला आहे अशा रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करण्यात आल्या होता.
सदर प्रकरणात दिवसा घरफोडी झाली असल्याने सदर प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखा यांचे कडे देण्यात आला होता सदरचा गुन्ना उघडकीस आणण्याकरीता पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी दिशा मार्गदर्शन दिले होते.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शोध पथकाने घटनास्थली उपलब्ध असलेले पुरावे, आणि घटनास्थळ पंचनामा करून त्याची बारकाईन पाहणी करून सविस्तर पडताळणी केली त्यामध्ये दोन संशयीत इसमांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे आढळून आले.
सदर इसम नागपुरनचे दिशेने गेले असल्याचे आढळून आले त्यासाठी पथकाने अथक परिश्रम घेत वरोरा ते नागपुर रोडील प्रतिषठाणे तसे टोल नाका परिसरातुन सर्व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सविस्तर पाहणी केली. यात चोरट्यानी सीसीटीव्ही मध्ये दिसू नये यासाठी खबरदारी घेतली. त्यांनी आड मार्गाने आपले वाहन टाकले होते. टोल नाका फुटेज मध्ये त्यांचे चेहरे आढळून आले नाही.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज चा धागा धरून सदर संशयीत इसमांचे फोटो कॉपी काढून नागपूर पोलीसाचे मदतीने त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता सदरचे इसम हे नागपुर येथीलच असल्याची माहिती प्राप्त झाली .
त्याचा शोध गुन्हे शोध पथकांनी नागपुर येथे जाऊन पडताळणी केली असता,सदर इसमांवर गुन्हे किती,आणि कोणते याबाबत सखोल चौकशी केली असता बिंग फुटले.
यात दोन्ही आरोपीत इसम नामे १) आकाश उर्फ गोलु दिलीप रेवडीया वय २९ वर्ष २) पंकज बामण खोकरे व ३९ रा. हुडकेश्वर मि. नागपुर यांना नागपुर तसेच भंडारा येथील कारागृहा मधून अटक करून ताब्यात घेतले. सोन्याचे दागिने हे नागपुर येथील सोनाराचे दुकानात गहाण ठेवले आहेत, असे सांगणे वरून तपास केला असता, नागपूर येथील मानेवाडा परिसरात असलेल्या सोनाराने दुकानात जाऊन तपास केला असता,सोनाराने पुढील माहिती दिली. एक सोन्याचे मंगळसुत्र गहाण ठेवले होते परंतु त्यांनी मुदतीत सोडवून न घेतल्याने त्याची गलाई करून लगड तयार करण्यात आली आहे. यात सोने वजन ३४.८२० ग्रॅम ज्याची लांबी २६ सेमी असलेली बाजारभाव ६८,४०० तोळा प्रमाणे २.३८.१६८ रुपये हा माल पंचासमक्ष जप्त करून प्रकरणाचा पुढील तपास हा गुन्हे शोध पथकाने प्रमुख बलराम झाडोकार व डीबी पथकाचे जमादार पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडोकार, विकास धडसे, मो. वसीम, पंकज उंबरकर, विशाल गेडाम करीत आहेत.
दरोड्याच्या छडा लागता लागेना?
लालगुडा भागातील पिदूरकर यांचे घरी अज्ञात इसमांनी दरोडा टाकून परिसरातील दुचाक्या चोरून नेल्या होत्या. असे अनेक चोऱ्याचे प्रमाण वाढलेच आहे. तर भर दिवसा रस्तावर लुटले जात असल्याने पोलिसांचा वाचक संपला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

.jpg)