-->

वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? Who is the face of Mahavikas Aghadi in Wani Assembly?

0


वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? 
Who is the face of Mahavikas Aghadi in Wani Assembly?

Sangini News Wani Yavatmal

नुकत्याच पहील्या टप्प्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी निर्णायक राहिली आहे. विदर्भातून पाच पैकी तीन जागा सहज आहे तर दोन जागांवर तुल्यबळ लढत आहे. यावेळी इंडिया आघाडीने,पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात N D A ला चांगलीच धडकी भरविली असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. यातच काही महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल? याकडे लक्ष लागले आहे.
वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण?  Who is the face of Mahavikas Aghadi in Wani Assembly?



वणी विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांना वणी,केळापूर विधानसभा मतदारसंघाचे मोठे पाठबळ दिले आहे. ही निवडणूक जनतेनी हातात घेतल्याने कोणालाही अडचण गेली नाही नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार असतांना केवळ मोठेपणा दाखवीत नेते मिरवताना दिसले आहे. परंतु घटक पक्षांनी इंडिया आघाडीसाठी तण मन धनाने प्रयत्न केले हे तितकेच खरे.

काँग्रेस साठीच बूथ?


काँग्रेस पक्षाच्या गावागावातील पुढारी,व कार्यकर्त्यांना गावागावात बूथ दिले. परंतु इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना कोणतेही बूथ अथवा, साहित्य पुरविले नसल्याची ओरड आहे. या निवडणुकीत लढा हा जनतेनी हातात घेतला होता. गावातून शहरात वार आलं होतं. गावात दिंडोरा होता मात्र शहरी मतदार गप्प होते. हे तितकेच खरे.

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला?


सध्यातरी वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत दोनच पक्ष मोठे दिसतेय. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षात उमेदवारी साठी चढाओढ सुद्धा बघायला मिळाली. अनेक जण आपापला दावा सांगत असल्याचेही लक्षात आले. यात शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, विधानसभा प्रमुख संजय देरकर, ही दोन नावे आघाडीवर असली तरी महिला उमेदवार सुद्धा लोकांच्या भेटीगाठीत व्यस्त असल्याचे दिसून आले. आता जर वणीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेली तर या तीन पैकी एक उमेदवार होऊ शकतो. बघुयात या लढाईत कोण बाजी मारेल ती वेळच ठरवेल.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष येथे दावेदार मोठ्या प्रमाणात आहेत. माजी आमदार वामनराव कासावार, ऍड देविदास काळे, प्रा.टिकाराम कोंगरे , संजय खाडे आदी नावे सध्यातरी चर्चेत आहेत. मात्र वणी विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुढे काय होणार ही येणारी वेळच ठरविणार. परंतु नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने उमेदवारी कोणाच्या पदरात पडेल सध्यातरी सांगता येत नाही. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी कायम राहील की वेगवेगळे लढेल हे सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top