वणी उपविभागात ७०% शेतकऱ्यांना कर्ज वाटप.
Sangini News
वणी:- एकीकडे शेतकऱ्यांचा हंगाम जवळ येऊन ठेपला असतांना बँक अध्यक्ष परदेश वारीवर आहेत. यातच वणी उपविभागात ७० टक्के पीक कर्जाचे वाटप माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी केले आहेत. यातच शेतकरी हित कोण जोपासतोय हे स्पष्ट होते आहे.Loan disbursement to 70% farmers in Vani subdivision.
बँक अध्यक्षांची परदेश वारी
वणी उपविभागात शेतकऱ्यांना ७०% ,",पीककर्ज वाटप करीत नवा उच्चांक गाठला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक अध्यक्ष असतांना अद्यापही पीककर्ज पूर्णतः वाटप झालेले नाहीत. परिणामी शेतकरी डबघाईला आला आहे. सोबतच वणी उपविभागात माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी जवळपास ७०% पीककर्ज वाटप केले आहे. प्रसंगी वणी उपविभाग सध्यातरी संचालक टिकाराम कोंगरे यांच्यामुळे अव्वल स्थानी आहे.
खते बियाणे घेण्याची लगबग सुरू असतानाच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची परदेश वारी ही कास्तकारांच्या जणू पथ्यावर पडतांना दिसते आहे. एकूणच जिल्हा बँकेने वणीच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज त्वरित वाटप करून बळीराजाला हातभार लावावा अशी मागणी कास्तकार करीत आहेत.
माझ्या कार्यकाळात बळीराजाला हातभार
मी अध्यक्ष असतांना शेतकरी राजा सुखी कसा होईल.व त्यांना हातभार कसा लागेल हेच अग्रस्थानी होते. आजही मी संचालक असतांना देखील वणी उपविभागात ७०% पीककर्ज वाटप केले असल्याने मी व्यक्तिशः समाधानी आहे. संचालक मंडळाने वणीचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून बळीराजाला हातभार लावले तर नक्कीच शेतकरी सुखी होईल.
प्रा. टिकाराम कोंगरे
माजी अध्यक्ष
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ

