-->

जनतेचे काम करण्यासाठी कटिबद्ध. : खा.प्रतिभा धानोरकर Committed to serving the people. : MP Pratibha Dhanorkar

0


जनतेचे काम करण्यासाठी कटिबद्ध. : खा.प्रतिभा धानोरकर


Sangini News

वणी: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेनी विश्वास ठेवून निवडून दिले.त्यांचे काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथील सत्कार सोहळ्यात बोलतांना व्यक्त केले आहे.Committed to serving the people. : MP Pratibha Dhanorkar
जनतेचे काम करण्यासाठी कटिबद्ध. : खा.प्रतिभा धानोरकर



वणी येथे नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपूर्ण शहरात फिरून आल्यानंतर स्थानिक शिवतीर्थावर सांगता सभा घेण्यात आली.

या सभेचे प्रास्ताविक संजय खाडे यांनी केले. प्रसंगी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. सत्कार सोहळ्यात बोलतांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मी संपुर्ण १८ लाख जनतेची प्रतिनिधी आहे. मला महाविकास आघाडी व इतर पक्षांनी भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल आभार व्यक्त करीत. येथील जनतेचे कामे करण्यास कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. जी लोक माझ्यापर्यंत कामे घेऊन आली त्यांची कामे करण्याचा मी प्रयत्न करणार असेही त्या बोलून गेल्यात.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रफुल मानकर,माजी आमदार वामनराव कासावार,माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर, ऍड देविदास काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे,काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या बोबडे सह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याचे आयोजन काँग्रेसचे संजय खाडे यांनी केले होते. प्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झालीत.यात वणी विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे त्यांनी आभार मानले. प्रथमतः नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची लाडू तुला करण्यात आली. यावेळी हजारोच्या संख्येनी जनसमुदाय उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top