शेतकरी अन सामान्यांना विद्युत कमीतकमी दरात मिळण्यासाठी लढणार:संजय देरकर
वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला कमीतकमी दरात विद्युत उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अभियान राबविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी मतदारसंघात अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला मोठया प्रमाणात जनतेतून प्रतिसाद मिळतो आहे.Farmers will fight to get electricity at minimum rates: Sanjay Derkar
गेल्या दहा वर्षात केंद्र व राज्य शासनाने दडपशाही धोरण अवलंबून सर्वसामान्य जनता,शेतकरी आदींना डबघाईला आणले आहे. शेतकऱ्यांचे विद्युत बिल,सामान्य जनतेच्या घरात वापरण्यात येणारी विद्युत यावर अनाठायी कर आकारण्यात येतो. विजेचा लपंडाव अन मानसिक त्रास, महावितरण जो सेवा कर घेतो यात ग्राहकांना धड सेवा ही मिळत नाही.
यासाठीच वणी विधानसभेचे प्रमुख संजय देरकरांनी लढा उभारला आहे. त्यासाठी गावागावात स्वाक्षरी अभियान राबवून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रसंगी मारेगाव तालुक्यात जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. यापुढे सामान्य जनतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असेल असे मत संजय देरकर यांनी व्यक्त केले.

