यवतमाळ जिल्ह्यात तीन आमदार देणारच!खा संजय देशमुख
वणी:- यवतमाळ
यवतमाळ येथे श्री बलवंत मंगल कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत,खासदार संजय देशमुख यांनी यवतमाळ वाशिम मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन आमदार देणारच!असे उद्गार सभेत काढले.
यवतमाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी संपर्क नेते खा.अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, गायकवाड,सह जिल्ह्यातील सर्वच नेते उपस्थित होते.
प्रसंगी खासदार संजय देशमुख यांनी यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन आमदार व महाविकास आघाडीचे इतर आमदार केल्याविना स्वस्थ बसणार नाही असे उद्गार काढले.
आता वणीत संजय देरकरांचे कार्यकर्ते आणि मतदार मोठया प्रमाणात आहेत. तर यवतमाळ मध्ये संतोष ढवळे यांचे समाजकार्य याच जोरावर शिवसेनेचे आमदार निवडून जाणार असा सूर ऐकायला मिळाला.
विधानसभा महाविकास आघाडी काबीज करणारच असे उद्गार खा अरविंद सावंत यांनी बोलताना व्यक्त केले.
वणी विधानसभा 76,मध्ये संजय देरकरांना मानणारा वर्ग जवळपास 30 हजारांवर आहे. म्हणजेच त्यांची सुरुवात येथूनच होते. यातच पक्षाचे पाठबळ आणि जनसंपर्क हीच जमेची बाजू असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी देरकरांना मिळणार असा सूर देखील ऐकायला मिळाला. तर यवतमाळ मध्ये रुग्णांची सेवा करणारे संतोष ढवळे यांचे समाजकार्य मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांच्या गळ्यातील ढवळे ताईत आहेत. परिणामी यवतमाळ विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाण्याच्या सूर ऐकायला मिळाला. एकूणच महाविकास आघाडी मधील वाटाघाटी कशा होतात याकडे लक्ष लागले आहे.

