-->

वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना(उ.बा.ठा.)पक्षाचा झंझावात

0

 वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना(उ.बा.ठा.)पक्षाचा झंझावात

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पेडणेकर यांनी तळागाळात शिवसेना पोहचविण्यासाठी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांना 17 जून लाआदेशीत केले होते.त्यानुसार संजय देरकर यांनी जनसंपर्क वाढवीत गावागावात माझी वीज आणि माझा अधिकार हे ब्रीद घेत अभियान राबविण्यात सुरुवात केली. आणि गावागावात पक्ष संघटन ,पक्ष प्रवेश आणि तरुणांना प्रोत्साहित करीत झंझावात सुरू केला.यातच अनेक तरुण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आकर्षित झालेत.  शिवसेनेला बळ देण्यासाठी संजय देरकर यांनी माझी वीज ,माझा अधिकार अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.Shiv Sena (U.B.T.) party's struggle in Wani assembly constituency

वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना(उ.बा.ठा.)पक्षाचा झंझावात


     वणी विधानसभेचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक पेडणेकर यांनी वणी शहरात येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची  वसंत जिनिंग येथे मतदारसंघातील समस्या जाणून घेतल्या.  प्रसंगी पेंडणेकर यांनी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांना वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष बळकट करण्यासाठी अभियान राबविण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने विधानसभा पक्ष प्रमुख संजय देरकर यांनी माझी वीज ,माझा अधिकार हे अभियान राबवित तरुण कार्यकर्त्यांची नवीन फळी जोडत पक्ष बळकट करण्यासाठी पाऊल उचलले आहे.  यात नवनवीन कार्यकर्ते मोठया प्रमाणात जुळताना दिसते आहे. वणी, झरी,मारेगाव तालुक्यात संजय देरकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झंझावात सुरू केला आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताहेत. एकूणच संजय देरकरांनी विधानसभा पक्ष प्रमुख पदाची धुरा हातात घेतल्यावर पक्षाला नवी बळकटी प्राप्त झाल्याचे बघायला मिळते आहे.


निकामी रांगणा पूल विद्यार्थ्यांसाठी धोकादायक!

रांगणा, वडगाव,भुरकी या गावाकडे जाणारा पूल निकामी झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,यातील अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणामुळे सदर पुलाला भगदाड पडले आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. सदर पुलाची उंची वाढवून मजबूत पूल तयार करून देण्याची मागणी संजय देरकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top