संजय खाडे यांचा झरी तालुक्यात झंझावात
Sangini News
झरी तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिबला सर्कल भागात विविध समस्या जाणून घेण्यासाठी तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे संजय खाडे यांचा जनसंपर्क दौरा 2 जून रविवारला आयोजित केला आहे.Sanjay Khade in Jhanjawat in Zari Taluka
संजय रामचंद्रजी खाडे यांचा दिनांक.2 जून 2024 रोजी शिबला सर्कल येथे जनसंपर्क दौरा राहणार आहे. सकाळी 10 वाजता शिबला येथून दौ-याला सुरूवात होणार आहे. यावेळी ते पाचपोर, कुंडी, शिरा, टोकी, महादापूर, चिचपोड. गारगोटी पोड इत्यादी गावांना भेट देणार आहे. या दौ-यात ते गावातील विविध समस्या व पक्ष संघटन याबाबत लोकांशी संवाद साधणार आहे. तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाधान कुणघाटकर शिबला यांनी केले आहे.
समस्या जाणून देणार मदत
या दौऱ्यात पाचपोर येथील ज्वारीचे फुटवे खाऊन मुत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत सुद्धा देणार असल्याची माहिती आहे. सोबतच शिबला येथील २१ वर्षीय आकाश मडावी या युवकाचा मृत्यू झाला होता. त्याचा विधवा असलेल्या निराधार आईला मदत सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.सध्यातरी संजय खाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक दौरे वाढविले असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

-min.jpg)