-->

इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात विषमतावादी विचारांच्या समावेशाला भारतीय बौद्ध महासभेचा कडाडून विरोध

0

 इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात विषमतावादी विचारांच्या  समावेशाला भारतीय बौद्ध महासभेचा कडाडून विरोध

संगिनी न्यूज वणी

शासनाने इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवतगीता,मनाचे श्लोक,मनुस्मृती या सारख्या विषमतावादी विचारांचा समावेश करण्याचे परिपत्रक काढले, यासाठी भारतीय बौद्ध महासभा संघटनेने कडाडून विरोध करीत उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे.Incorporation of Heterogeneous Thoughts into the Curriculum of Class III to XII

इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात विषमतावादी विचारांचा समावेशाला भारतीय बौद्ध महासभेचा कडाडून विरोध

     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तयार केलेल्या राज्य आराखडा शालेय शिक्षण 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत केलेल्या


आवाहनानुसार खालीलप्रमाणे हरकत या पत्रा‌द्वारे नोंदविण्यात येत आहेत.


1) इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्‌गगीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृति यांच्या विषमतावादी विचारांचा, धोरणांचा समावेश करणे या बाबी भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार कलम 13,14,17,19, 21, 28 नुसार बेकायदेशीर व असंविधानिक असल्यामुळे त्या विरोधात तीव्र हरकती नोंदविण्यात येत आहे.


2) आपल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्‌यानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक, भगवद्‌गगीता आणि मनुस्मृतीच्या काही अंशाचा समावेश करणे आक्षेपार्ह असून, धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतातील सर्व नागरिकास समान असलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेला काळीमा फासणारी बाब आहे.


3) तसेच सर्जनशील भारताची निर्मिती करणाऱ्या शिक्षण प्रणालीमध्ये अशा प्रकारच्या समता मुलक समाज निर्मितीच्या संविधानाच्या तत्त्वाला मूठमाती देणाऱ्या विषमता वादाचा पुरस्कार व त्याचे समर्थन करणाऱ्या अभ्यासक्रमाचा शालेय शिक्षणात समावेश करून गोर-गरीब भारतीय नागरिकांमध्ये भय आणि मानवी विषमता निर्माण होण्यास खतपाणी घालण्याचा प्रयत्न स्पष्ट होत आहे.


4) आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष संविधानाने देशातील सर्व जाती धर्माना संरक्षित करत, कलम 28 प्रमाणे आश्वस्त केले आहे की, कलम 28 (1) नुसार, पूर्णतः राज्याच्या निधीतून चालविल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही अशी तरतूद आहे, त्यामुळे सरकारकडून कोणत्याही धर्माच्या विचारसरणीच्या बाबी शिकविता येणार नाहीत.


5) त्याचबरोबर भारतीय संविधानातील कलम 13 (1) नुसार, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे, ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर, ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत आहे, 13 (2) नुसार राज्य या भागाने ps प्रदान केलेले 13/06/24 आणि हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही या खंडाचे उल्लंघन करुन केलेला कोणताही कायदा, आदेश, नियम, विनिमय, सूचना, शिक्षण,

प्रशिक्षण इत्यादी शून्यवत ठरविले आहेत. असे असताना उपरोक्त बाबी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे देशातील युवा वर्गाला अधोगतीच्या विषमतेच्या दिशेने पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते आहे.


वरील पार्श्वभूमीवर प्रस्तावित मसुदयामध्ये मनाचे श्लोक, भगवद्‌गीता आणि मनुस्मृतीच्या काही अंशाचा समावेश करणें भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार 13,14,17,19,21,28 नुसार बेकायदेशीर व असंविधानिक असल्यामुळे त्या बाबी रद्द कराव्यात आणि संविधानाची प्रास्ताविका, अनुछेद 13 ते 32 पर्यंतचे मूलभूत अधिकार आणि भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या मूल्यांचा समावेश करावे की ज्यामुळे भारतीय नागरिक आपल्या हक्क आणि अधिकारासंबंधी आणि कर्तव्या संबंधी जागृत होतील. तेच देश हितकारक आहे.


वरीलप्रमाणे दुरुस्ती न झाल्यास दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दल आणि संविधान समर्थक समाज, विविध संघटनांच्यावतीने महाराष्ट्रभरामध्ये तीव्र स्वरुपाचे पडसाद उमटतील आणि उग्र आंदोलन छेडण्यात येतील त्याची संपुर्ण जबाबदारी आपली असेल, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.


याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य. आंबेडकर (ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष) व डॉ. हरीष रावलिया (ट्रस्टी चेअरमन), अॅड. सुभाष जौंजाळे (रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन) यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ दयावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत राज्य शासनाला दिले आहे.

यावेळी मोरेश्वर देवतळे जिल्हा सरचिटणीस रमेश तेलंग जिल्हा संघटक यवतमाळ-पुर्व ,प्रविण वनकर तालुकाध्यक्ष वणी दादाजी घडले उपाध्यक्ष तालुका वणी समता सैनिक सचिन वानखेडे प्रांजल वनकर .

व भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी, सैनिक व बौध्द उपासक उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top