दोन दुचाकी चोरटे वणी पोलिसांच्या जाळ्यात
संगिनी न्यूज वणी
बुटीबोरी परिसरातून दुचाकी चोरून वणीत विकण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन दुचाकी चोरट्यांना वणी पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने जेरबंद केल्याची घटना सोमवारी घडली आहे.
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी यांनी सर्व बिट जमादार आणि डीबी पथकाला शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्गदर्शन करून अनोळखी लोकांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने डीबी पथकाचे जमादार विकास धडसे आणि चमूगस्तावर असतांना त्यांना बुटीबोरी येथून चोरलेली दुचाकी वणीत विकण्यासाठी दोघे वणी येत असल्याची माहिती मिळताच डीबी चे जमादार विकास धडसे,सागर सिडाम या लक्ष ठेवून होते. शहराबाहेरील स्मशानभूमी जवळ दोघे जण संशयित रित्या उभे असल्याचे दिसताच त्यांनी दोघांची चौकशी केली. त्यात दुचाकी पासिंग नागपूर ग्रामीण ची असल्याने संशय अधिकच बळावला. तेव्हा दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तुषार उर्फ रावण रमेश कुळमेथे, 25 , राजकुमार बापूराव नैताम 30 दोन्ही जुनी वस्ती बुटीबोरी नागपूर असे सांगितले असता त्यांच्या जवळून दुचाकी क्रमांक एम एच 40 ए डब्लू 9229 ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता साई मंगल कार्यालय येथून 2 जून ला सायंकाळी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर वणी पोलिसांनी ठाणेदार बुटीबोरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी एक पथक वणी साठी रवाना केले आहे . सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल बेहरानी गुन्हे शाखेचे जमादार विकास धडसे,गजानन कुळमेथे,पंकज उंबरकर, सागर सिडाम गजानन डोंगरे आदींनी पार पाडली.

%20(1).jpg)