-->

वणी विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला येणारच! जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड.

0



वणी विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला येणारच! जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड.


वणी(रवी ढुमणे)


घर तेथे शिवसैनिक अभियान संजय देरकरांनी "माझी वीज आणि माझा अधिकार" माध्यमातून अभियान राबविले परिणामी संजय देरकरांची मेहनत आणि जिद्द यातून शिवसैनिकांनी त्यांना सहकार्य केले आहे. यातूनच तरुण शिवसेनेकडे आकर्षित होत आहे. ही बाब लक्षात घेत विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उघडले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.
वणी विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला येणारच! जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड.



माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वणी विधानसभेचे प्रमुख संजय देरकर यांनी जनसंपर्क वाढवत वणी विधानसभा क्षेत्रात "माझी वीज ,माझा अधिकार '" हे अभियान राबवित जनसंपर्क वाढविला आहे. अनेक गावातील तरुणांनी देरकरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.

परिणामी येत्या विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच वणीची उमेदवारी मिळणार असल्याचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी मत व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा उमेदवार जिंकणारच! असे उद्गार यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी काढले आहे.


शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची अनुपस्थिती?



जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी उदघाटक म्हणून राजेंद्र गायकवाड होते,तर अध्यक्ष जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर होते. मात्र जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी जिल्हा प्रमुखांची अनुपस्थिती होती.

वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पहिल्यांदाच वणी शहरात जनहितासाठी कार्यालय स्थापन केले . प्रसंगी या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले. सर्वाना निमंत्रित करून सुद्धा जिल्हा प्रमुख उद्धाटन कार्यक्रमात अनुपस्थित राहिले. परिणामी अनेक प्रश्न उपस्थित झालेआहे.


सामान्यांच्या देरकरांना प्रतिसाद



1999 पासून जनसेवेत असलेले संजय देरकरयांनी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या, ३० ते ४० हजाराहून अपक्ष असून सुद्धा मतदान मिळविले आजही त्यांचे वैयक्तिक मते ३० हजाराहून अधिक आहे. पूर्वी वणी विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळत होती, तर तरी सुद्धा 2009 च्या निवडणुकीत संजय देरकर यांनी 42 हजार मते मिळविली अवघ्या ५ ते ७ हजाराच्या फरकाने अपक्ष असूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

सद्यस्थितीत संजय देरकरांचे वैयक्तिक मते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे मते विचारात घेतले तर महाविकास आघाडीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाला वणी ७६ ही जागा दिली तर देरकरांचे वर्चस्व वाढणार यात तिळमात्र शंका नाही.
युक्ता रवी सुचिता खंडाळकर हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!बाळा

शुभेच्छुक

पौर्णिमा संतोष भोंगळे, वर्षा दिलीप भोंगळे, मंगला दिलीपराव खंडाळकर, दिग्विजय पौर्णिमा संतोष भोंगळे श्रवण दिलीप भोंगळे आणि समस्त परिवार.



यवतमाळ जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड हे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करायला आले होते. बराच वेळ त्यांनी जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांची वाट बघितली मात्र जिल्हा प्रमुख आलेच नाही. परिणामी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत गायकवाड यांनी उदघाटन केले. प्रसंगी शिबसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय निखाडे, गणपत लेडांगे,शरद ठाकरे,सुनील ढुमणे,रामचंद्र वाभिटकर,.मस्की साहेब, डीमनताई टोंगे, संतोष माहुरे,रवी बोढेकर,संजय बीजगुणवार, आदी शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकीत शिवसेना((उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाची कामगिरी


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी गाव,पोड, तांडे,फिरून जुने कार्यकर्ते सक्रिय केले होते.आणि दिवसरात्र प्रयत्न करून मताधिक्य प्राप्त करून दिले होते. परिणामी वणी विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात जनमत असल्याचे दिसते आहे. एकूणच जर का? शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जर वणी 76 ही जागा मिळाली तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top