-->

सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे,"वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे,

0

 "वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानांच,"अंतर्गत,मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न....


      सन्मान स्त्री शक्तीचा या  फाऊंडेशन द्वारे,"वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे,हा कार्यक्रम टाकळी(कुंभा) येथे आयोजीत करण्यात आला होता.

सन्मान स्त्री शक्तीचा या  फाऊंडेशन द्वारे,"वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे,


        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष किरणताई संजय देरकर या प्रमुख उपस्थित होत्या. सोबतच  प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस पाटील संगीता राजू आदेवार,सरपंच प्रेमीला गजानन आदेवार, वैशालीताई देठे, जिजाताई वरारकर, मीनाक्षी मोहिते, शीतल करमनकर अंगणवाडी सेविका सीमा गेडाम,आशा सेविका पंचफुला खेवले, वर्षा पोंगडे, रोहन आदेवार,  प्रवीण डहुले, देवेंद्र देवतळे, उपस्थित होते.

     त्या वेळी  गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. किरण ताई देरकर यांनी उपस्थीतीत महिलांना विधवा प्रथा,रुढी-परंपरा समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले.

       परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ  प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन  महिलांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी  ही संघटना नेहमी तत्पर असेल अशे आश्वासनच नाही तर विश्वास निर्माण केला. 

        घरातील महिला आनंदी,निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते.महिलांनी गृहकर्तव्य बजवताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रकृतीच्या छोट्या तक्रारीकडेही वेळीच लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे.आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन किरणताई देरकर ,वैशाली देठे यांनी केले.

        जिजाताई वरारकर यांनी प्रास्ताविक मधुन  सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन  यांच्या कार्याविषयी माहीती दिली.गावातील विधवा महिलांना वाण देउन आपल्या बोलण्यातूनच  नाही त कृतीतून समाज बदल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

       उपस्थीतीत महिलांनी आपल्या कला सादर केल्या.या कार्यक्रमात प्रथम क्रमांक कमलाबाई आदेवार यांनी पैठणी जिंकली द्वितीय क्रमांक सुवर्णा डाहूले तर तृतीय रेखा राऊत यांनी पटकाविला.

        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश डाखरे,सोनाली डाखरेबेबी खेवले, अर्चना निवलकर, विताबाई गेडाम, कल्पना जुमनाके, अन्नपूर्णा मडावी व महिलांनी  परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top