"माझी वीज माझा अधिकार" शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मोहिमेला यश.
वणी(sangininews.in)
वणी विधानसभा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी १७ जून रोजी सुरू केलेल्या"माझी वीज,माझा अधिकार" या मोहिमेला अखेर यश मिळाले आहे.Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) campaign "My power my right" success.
मागील महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निरीक्षक पेंडणेकर यांनी वणी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेतली होती. प्रसंगी सदर अभियान राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी वणी,झरी,मारेगाव तालुक्यात "माझी वीज माझा अधिकार हे गावागावात जाऊन अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. या अभियानाची शासनाने दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने सभागृहात ७ एच पी कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी बांधवांना मिळाला थोडा दिलासा!
वणी विधानसभा प्रमुख यांनी पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक यांचे सांगण्यावरून मोहिमेला सुरुवात केली होती. यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा,मात्र २०० युनिट घरगूती वीज पूर्णतः माफ करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आहे.या "माझी वीज, माझा अधिकार ही मोहीम राबविताच मागेल त्यांना सौर ऊर्जेचा पंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ही एक उपलब्धी या मोहिमेमुळे झाली आहे.
दोनशे युनिट घरगुती वीज माफ करावी.
सध्या विजेचे दर गगनाला भिडले आहे. सामान्य जनतेला महावितरण चा अधिभार सहन करावा लागतो आहे. अव्वाच्या सव्वा विजेचे देयके येत आहे. आधीच कोरोना काळात अडकलेली जनता त्रस्त आहेत. यासाठी दोनशे युनिट वीज शासनाने माफ करावी. व त्यापुढील देयके अडीच रुपये प्रमाणे देण्याची मागणी आम्ही शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करतो आहे.
संजय देरकर
वणी विधानसभा शिवसेना प्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
यवतमाळ जिल्हा

%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A4%B6!%20(1).jpg)