वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची होतेय मुस्कटदाबी
वणी:- आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी -जामनी या हिरवळीने नटलेल्या तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मुकुटबन येथील अधिकारी वेठीस धरत कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून अनाठायी रोख वसूल करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी केले आहेत.
आदिवासी बहुल असलेल्या झरी-जामनी तालुक्यातील मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना वेठीस धरून जंगलात आग लागली तर? झाडांच्या फांद्या, व माती टाकून आग विझविणे, यात येत असलेले शासनाचे,पैसे न खर्च करता,कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करा असे आदेशीत करणारे मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे यांच्या विरोधात वन कर्मचारी यांनी एल्गाए पुकारला आहे. शासनाचे वन विभागावर होणारा खर्च कोण? दडपतोय की काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उपवनसंरक्षक पांढरकवडा यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. यात "'तेरी भी चूप,मेरी भी चूप"असे चित्र बघायला मिळते आहे.
वणीतील एका नेत्याने केली हेराफेरी?
वणीतील माजी पदाधिकारी असलेल्या नेत्याकडे वनविभागाचे कर्मचारी आपले गार्हाणे घेऊन आले होते. प्रसंगी त्यांनी स्वतःच्या लेटर पॅड वर पत्र लिहीत शासनाला निवेदन दिले होते. मात्र सरकार आपलेच या तोऱ्यात राहून सदर पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्थगन प्रस्ताव पटलावर ठेवला. परंतु प्रस्ताव पटलावर गेला खरा. पण माशी तेथेच शिंकली असल्याची खमंग चर्चा वनविभागाच्या वर्तुळात ऐकायला मिळाली.
शासनाचा निधी अधिकाऱ्यांच्या घशात
जंगलात आग लागली तर त्यावर पाणी मारण्यासाठी शासन निधी देते. मात्र सदर निधी वरिष्ठांच्या आदेशाने अधिकारी अन कोणाच्या घशात जाते हे कळायला मार्ग नाही दरवर्षी जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी शासनाचा करोडो रुपयांचा निधी प्रत्येक वर्तुळात खर्च करायला येतो. परंतु पुढारी नेते कर्मचाऱ्यांना वेठीस धरून सर्व निधी हडपायला पुढेच आहेत.
कमकुवत बांध
कर्मचाऱ्यांना वेठीस धरून स्वतः काम करा असे आदेश देणारे अधिकारी शासनाचा निधी न देता स्वतः कर्मचाऱ्यांना काम करा असे सांगून दबाव टाकत असल्याचे बघायला मिळते आहे. यात बांध घातले खरे परंतु एकाच पावसात वाहून गेले आहे. यात अधिकारी आणि इतरांचे साटेलोटे तर नाही ना?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे. या संबंधी कर्मचाऱ्यांनी तक्रार सुद्धा केली आहे.
मुकुटबन वनविभागाने हडपला निधी?
दरवर्षी जंगल जडू नये म्हणून वन विभागाकडून निधी मुकुटबन वनपरिक्षेत्राला प्राप्त होत असतो या निधी मधून वनसंरक्षण मजुरा मार्फत जंगल जळू नये म्हणून उपाययोजना करायच्या असतात परंतु कुठलेही मजूर न लावता येथील आर एफ ओ ने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठलीही उपाययोजना न करता XDA निधीचा विल्हेवाट लावली असल्याची वनविभागात जोरदार चर्चा सुरू आहे. आता शासनाचा निधी कुठे गेला. हा प्रश्न अनुत्तरित आहे.
माझ्या विरोधात षडयंत्र
मी असा कोणताही प्रकार केलेला नाही. कर्मचारी माझे विरुद्ध खोटे आरोप करीत आहेत.
तुळशीराम साळुंखे
वनपरिक्षेत्र अधिकारी
मुकुटबन

.jpg)