वणी येथील शेकडो युवकांनी बांधले शिवबंधन, युवासेनेत जाहीर प्रवेश
वणी:-वणी येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष धनराज येसेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट शनिवार ला शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्तासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
Shivbandhan organized by hundreds of youths from Wani and public entry into Yuva Sena
गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान वणी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर वणी,झरी,मारेगाव तालुक्यातील असंख्य युवक,तरुणांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची कास धरली आहे. सोबतच तीनही तालुक्यातील जनतेनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास दाखवत शिवबंधन बांधले आहे. यातच मंगळवारी वरोरा मार्गावरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात युवा सेनेत शेकडो युवकांनी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी संदेश टिकत, हर्षल गूहे, भोला पांनघाटे, निकेश कडूकर, कार्तिक चांदेकर, चिंतन लोडे, निरक लोणारे,आर्या राऊत, प्रेम भटगरे, आशिष पिदुरकार, बादल येसेकर, धनराज मडावी, जावेद पठाण, सुजल जुमडे, कुणाल आगुलवर, हर्षल मडावी, संकेत विधाते, तेजस बागडे, आदित्य पाटिल, शेजल जुमडे,यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. यात कोलार पिंपरी,रासा, लालगुडा ,वणी येथिल युवकांचा समावेश आहे.
मागील कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहणारे राष्ट्रवादी पक्षाचे धनराज येसेकर यांनीही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक विनोद ढुमणे, चेतन उलमाले, मनिष बत्रा,भगवान मोहिते, साकेत भुजबळराव, उपस्थित होते. यावेळी शेकडो तरुणांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना- युवासेनेत प्रवेश केल्याने पक्षाला नवसंजिवनी मिळाली आहे.