भगव्या सप्ताहात आदिवासी दिन साजरा!
वणी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिनानिमित्त कुरई,पारडी(गोवारी) या गावात जाऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला.
तालुक्यातील कुरई,पारडी(गोवारी) या गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरपूर सर्कल मधील गावांमध्ये जाऊन जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आदिवासी बांधव तसेच नागरिकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पटवून दिले.
कुरई, पारडी येथे थाटामाटात सोहळा संपन्न!
भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, श्याम दादा कोलाम, राणी दुर्गावती, यांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाकरिता गावा गावामध्ये अनेक आदिवासी बांधव महिला युवक युवती व नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते व बिरसा ब्रिगेड संघटने कडून प्रत्येक गावात संजय देरकर, यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, झरी तालुक्यातील शिवसेना जिल्हा उपप्रमुख} संतोष माहुरे, जिल्हा संघटिका डिमनताई टोंगे, संजय देठे, मंगेश मते, प्रशांत बल्की, भगवान मोहिते, डॉ. जगण जुनगरी, लोकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे, अजय कौरासे, योगीराज आत्राम, विठ्ठल ठाकरे, राजू झाडे, कवडू उईके, विनोद कुडमेथे, अनिल उईके, मोरेश्वर किनाके, सुभाष उईके, आकाश आसुटकर, विकास धगडी हे उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे परिसरात सर्व आदिवासी बांधव भगिनी मध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.