संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली मंदर येथे शिवसेनेची शाखा पुनर्गठीत!
वणी:-विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे प्रमुख संजय देरकर यांनी भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने गाव तिथे शाखा,घर तिथे शिवसैनिक हे धोरण राबवित गटा तटाच्या राजकारणात गुरफटलेल्या शिवसैनिकांचा सत्कार घेत, शिवसेनेला बळ मिळवून दिले आहेत. यातच वणी तालुक्यातील मंदर येथील शाखा पुनर्गठीत केली आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांच्या आदेशान्वये वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी आदेश स्वीकारीत वणी विधानसभा मतदारसंघात झंझावात सुरू केला आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघ ढवळून काढत गावागावात शिवसेनेचा भगवा फडकवत अनेक शाखा पुनर्गठीत करीत,युवक,तरुणांना जवळ करून अभियान राबविले आहे. यातच वणी तालुक्यातील मंदर येथील शिवसेनेची शाखा अमोल चोपणे ,पुरड नेरड येथील राजू लडके,राजू मोहितकर, सुशांत उपरे यांच्या अथक परिश्रमाने मंदर येथील शिवसेना शाखा पुनर्गठीत करीत,युवक,तरुणांना प्राधान्य देत झंझावात सुरू केला आहे.
यात मंदर येथील अमोल चोपणे,सुशांत उपरे, राजू मोहितकर,अरविंद भट,शेख कुदुस,शेख हुसेन, विकास मडकाम, गजानन चोपणे,विठ्ठल तिखट,गजानन ढेंगळे,निलेश मुळे, अमर बोंडे, रुदा खुटेमाटे, निलेश सातपुते, साजन वनकर,विशाल विधाते,विवेक वानखेडे,अतुल विधाते,गजानन जाधव, अनिकेत देऊळकर, संदीप बुरडकर,प्रशांत झिलटे, विक्रांत बावणे,सोनू ढेंगळे,अश्विन चिकणकर,वैभव सोयाम,योगेश बोंडे,दिनेश गुहे,संदीप चौधरी,विठ्ठल धाबेकर आदींनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख यांचे नेतृत्व स्वीकारत वणी तालुक्यातील मंदर येथील शिवसेनेची शाखा मजबूत करीत पुनर्गठीत केली आहे.
परिणामी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे प्रमुख संजय देरकर यांना वणी विधानसभा क्षेत्रात वाढते मनोबल मिळतांना दिसते आहे.
अमोल चोपणे, राजू मोहीतकर सुशांत उपरे,राजू लडके यांच्या अथक परिश्रमाने मंदर येथील शिवसेनेची शाखा पुनर्गठीत झाली आहे.