सोया गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
वणी:- मारेगाव येथील सोया गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्ट ला भेट देत व्यवसायाबद्दल माहिती घेतली.
मारेगाव येथे सुरू करण्यात आलेल्या सोया गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कार्यालयात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट देत व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली. सोबतच व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केले.
प्रसंगी डिमनताई टोंगे यांनी कंपनीच्या जागेसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार,कृषी अधिकारी,निकाळजे,आत्मा चे पारस्कर आणि सोया गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल आदी उपस्थित होते.
डिमनताई टोंगे यांची जागेसाठी मागणी
हे मारेगांव तालुक्यात दौऱ्यावर येऊन सर्व कार्यालय प्रमुखांच्या कामाचा आढावा तहसील कार्यालय मारेगांव येथे घेतला होता. आढावा/बैठक संपन्न झाल्यानंतर FTO फारमर फ्रुड्युसर कंपनी मारेगांव येथे भेट देऊन तेथील चालू असलेल्या कार्याची, कामाची पहाणी केली. पहाणी केल्या नंतर कंपनी मार्फत नोंदणीकृत असलेल्या सभासद/सदस्यांना दिल्या जाणाऱ्या शेती विषयक सेवा/सुविधा बाबत चर्चा केली. अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक,व संचालिका श्रीमती डिमन टोगे यांनी निवेदन देऊन अशी विनंती केली की, कंपनी साठी मोठे गोडाऊन हवे आहे परंतु कंपनीची जागा म्हणून अडचणी निर्माण होत आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ यांनी औद्योगिक वसाहत मारेगांव येथे जागा/जमीन आहे काय? अशी उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगांव यांना विचारपूस करुन असल्यास त्यांना जागा उपलब्ध करून देण्या संबंधाने सर्व संबंधितांना सुचना केल्या आहेत. कंपनी मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा कौतुक करुन भविष्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा प्रकारे देता येतील या करीता प्रयत्न करावेत कंपनी कशी नफ्यात येईल अशा दृष्टीने वाटचाल चालू ठेवावी अशा सुचना केल्या. प्रसंगी कंपनीच्या अध्यक्षानी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर संचालिका सौ. डिमनताई टोगे यांनी सहायक जिल्हाधिकारी कु. तिवारी मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.