महिलांसाठी शिबिराचे कार्य मोलाचे! :खा. प्रतिभा धानोरकर!

0

महिलांसाठी शिबिराचे कार्य मोलाचे! :खा. प्रतिभा धानोरकर!


वणी :- गुरुदेव नागरी सह.पत संस्था, महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल कॅन्सर इन्टीट्यूट नागपूर त्यांचे सहकार्याने महिलांकरिता नि:शुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन शेतकरी मंदिर वणी येथे करण्यात आले होते. प्रसंगी चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे व सहकारी उपस्थित होते.TFT3Organizing free breast cancer camp for women

महिलांसाठी शिबिराचे कार्य मोलाचे! :खा. प्रतिभा धानोरकर!


यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शेतकरी मंदिरात गुरुदेव नागरी पतसंस्था, महिला काँग्रेस कमिटी व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांचे सहकार्याने महिलांकरिता निःशुल्क स्तनांचा कॅन्सर, व गर्भाशय तपासणी सोबतच उपचार शिबिराचे आयोजन मंगळवार १३ ऑगस्ट ला करण्यात आले होते.Camp work for women is worth it! : eat  Pratibha Dhanorkar!

या शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर, वणी,आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी करीत महिलांना मोलाचा सल्ला दिलाय! प्रसंगी मातृत्व संगोपनासाठी हे असे शिबीर राबविले तर, "माझ्या लेकी,बहीण,आणि मातेला" अशा शिबिरांचा नक्कीच फायदा होईल असे त्यांनी बोलतांना सांगितले. सोबतच जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी खास करून महिलांसाठी केलेल्या या शिबिराचे कौतुकच केले आहे.

प्रसंगी या शिबिराचे अध्यक्ष स्थानी नरेंद्र पाटील ठाकरे, प्रमुख उपस्थिती, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, पणन चे संचालक संजय खाडे, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती माजी अरुणा खंडाळकर, वसंत जिनिंग चे मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव वर्हाटे, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष राजू कासावार,राजाभाऊ पाथ्रडकर, डॉ मोरेश्वर पावडे, घनश्याम पावडे,राजेंद्र कोरडे, अशोक पांडे, विजय नगराळे, डॉ संचिता नगराळे, ओम ठाकूर,आशिष मोहितकर, मेघशाम तांबेकर, ज्ञानेश्वर बेलेकर, अविनाश थेरे,आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांचे विशेष सहकार्य!


नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर डॉ पवन अरघडे, डॉ मैथिली, डॉ शुभांगी यांच्या चमूने महिलांना स्तनांचा कॅन्सर, व सोबतच गर्भाशयाचे होणारे त्रास याबाबत सविस्तर माहिती देत उपचार केले. त्यांच्यासोबत वणी, व वणी ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका,आशा गट प्रवर्तिका, आणि समाजसेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग


ग्रामीण व तसेच शहरी भागातील महिलांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीत , स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली.आणि या शिबिरात जवळपास तीनशे महिलांनी सहभाग नोंदविला.


शिबिराला वणीच्या डॉक्टरांचे सहकार्य!


वणी येथील डॉ सचिन दुमोरे, डॉ प्रणाली दुमोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी समीर थेरे यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top