-->

पुरात वाहून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली

0

पुरात वाहून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली 


वणी;- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झोला शिवारातील वर्धा नदीच्या पात्रात अनोळखी मृतदेह आढळून आला होता. वणी पोलिसांनी तत्परता दाखवीत अवघ्या काही तासातच सदर इसमाची ओळख पटवून दिली आहे. Finally "that" body was identified...

अखेर"त्या" मृतदेहाची ओळख पटली....



तालुक्यातील झोला शिवारातील वर्धा नदीच्या पात्रात पुरात वाहून आलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. यासंबंधी वणी पोलिसांनी पंचनामा करून सदर इसमाचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात असलेल्या शवगृहात ओळख पटविण्यासाठी ठेऊन तपासाला सुरुवात केली होती. जमादार विठ्ठल बुरेवार यांनी तपासचक्रे फिरविली आणि अवघ्या काही तासातच सदर मृतदेहाची ओळख पटवून दिली.

सदर इसमाचे नाव राजेश रामभाऊ साधनकर, रा. टिळक नगर हिंगणघाट जिल्हा वर्धा असल्याची ओळख आहे. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून खात्री करून घेतली आणि मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर राजेश चा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

राजेश पुरात वाहून कसा आला हे एक कोडेच आहे. तूर्तास वणी पोलीस ठाण्यातील जमादार विठ्ठल बुरेवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top