-->

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा? हालचाली सुरु

0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा? हालचाली सुरु..


वणी;- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास ९३८ आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. The big news for farmers will the state government announce loan waiver? Move on..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा? हालचाली सुरु


पिक विम्यापासून शेतकरी अद्यापही वंचितच!

मागील हंगामात शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी एक रुपयांत पीक विमा काढला होता. संबंधित विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण सुद्धा केले होते. परंतु आजतागायत बहुतांश शेतकरी पिकविम्या पासून वंचितच राहिले आहे.


वित्त विभागाकडून हालचाली सुरु?


राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे. यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

अधिकृत घोषणा नाही


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ९३८ आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार – अब्दुल सत्तार


दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते. "कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून३ लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करू लागलं आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत करणार की घोषणा हवेतच राहणार? हे बघणे महत्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top