पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा शिवसेना (उबाठा) पक्षाचा इशारा!
वणी :- तालुक्यातील निंबाळा (बु) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक इयत्ता ५ वर्गासाठी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी या शाळेला शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समितीमध्ये शाळा भरविण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने गटविकास अधिकारी यांना निवेदन देत दिला आहे. Shiv Sena (Ubt) party's warning to build schools in Panchayat Samiti!
वणी तालुक्यातील निंबाळा ( बु) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या ३२ असून ईय्यता १ ते ५ मीळुन एकच शिक्षक आहे. पाच वर्गातील ३२ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकाच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. परिणामी पालकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.
शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे.(Right To Education) शिक्षणापासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे हा मोठा गुन्हा आहे येथील पालकांनी शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन येत्या 8 दिवसात शाळेला शिक्षक उपलब्ध करुन देण्यात यावा अन्यथा पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी यांना निवेदन देतेवेळी किरण देरकर,ममता पारखी,अजिंक्य शेंडे, सरपंच ढाकोरी- अजय कवरासे, प्रविण गोहने , हरिचंद्र डवरे ,संदीप मुसळे, अमोल मुक्के अमोल वाघाडे प्रशांत शेंडे, आकाश आसुटकार , निंबाळा येथील अनेक पालक उपस्थित होते.

%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE!%20(1).jpg)