दुर्दैवी! खातेरा येथे वीज पडून दोन जनावरे ठार.
झरी जामणी : तालुक्यात शुक्रवारी (ता. ३० ऑगस्ट) दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज कोसळून खातेरा येथे दोन म्हशींचे मृत्यू झाला आहे.
झरी जामनी तालुक्यातील खातेरा परिसरात शुक्रवारी अचानक पणे ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात खातेरा जंगलात सुमारे साडेचार वाजताचे च्या सुमारास अचानक वीज पडली. अतुल सुरेश भेदोडकर यांच्या गोधनातील ३ वर्षीय रेडा आणि ४ वर्षीय म्हैस अशा दोन जनावरांचा विज पडून जागीच मृत्यू झाला आहे.