मारेगावातील क्लब मध्ये तरुणाची आत्महत्या..

0

मारेगावातील क्लब मध्ये तरुणाची आत्महत्या..

 मारेगाव:-  शहरात करमणुकीच्या नावाखाली सुरु असलेल्या  क्लब मध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. A young man committed suicide in a club in Maregaon.

मारेगावातील क्लब मध्ये तरुणाची आत्महत्या..

तालुक्यातील टाकळखेडा येथील नवीन मोतीगिरी बामणे (वय 35)  या तरुणाने रविवार १ सप्टेबरचे दुपारी 2 वाजताचे क्लब मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवीन च्या पश्चात पत्नी व दोन वर्षाची चिमुकली आहे. दिवंगंत नेते मोतीगिरी बामणे यांचे ते चिंरंजिव आहे. मोतीगिरी बामणे यांच्या निधना नंतर लहान वयातच नविन बामणे यांच्यावर संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी आली होती. मात्र ऐन उमेदीच्या काळात त्यांच्यावर आत्महत्येची नामुष्की ओढावली आहे.करमणुकीच्या नावाखाली शहरात सुरु असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील क्लब मध्येच नविन ने आपली जिवन यात्रा संपविली आहे. कमावत्या कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

करमणुकीच्या नावावर चालतोय जुगाराचा खेळ.

करमणुकीच्या नावाखाली या क्लब मध्ये बाहेरील खेळाडु खेळ, खेळण्यासाठी मुक्कामी येत असतात. छोट्या ठेकेदार पासुन दुकानदारसह मोठं मोठ्या व्यापाऱ्या पर्यंत येथे दैनंदिन  रेलचेल सुरू असते, हौशी आपली हौस पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असतो. हारजित नंतर मात्र खिसा रिकामा झाल्याचा पश्चाताप करत तो बाहेर पडत आहे.  मेहणतीने केलेली जमा पुंजी तो क्षणात खाली करीत असल्याची ओरड आहे. 

वाढदिवसाच्या दिवशीच केली आत्महत्या.

१ सप्टेंबर ला नविनचा वाढदिवस होता. मात्र वाढदिवस साजरा करण्या ऐवजी त्याचेवर आत्महत्येची नामुष्की या क्लब मध्ये‌ का ओढवली? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

   या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन म्रुतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता हलविला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top