वणी विधानसभेत काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार ?
वणी:- विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षातील अनेकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागल्याचे बघायला मिळते आहे. येत्या काळात वणी विधानसभेत काँग्रेसचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. Who will be the candidate of Congress party in Wani Vidhan Sabha?
वणी विधानसभा क्षेत्रात मागील काळात काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी नेतृत्व केले होते. त्यांची पक्षात चांगलीच पकड आहे. यावेळी सुद्धा कासावार यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सोबतच ओबीसींचा चेहरा असलेले प्रदीप बोनगिरवार ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.टिकाराम कोंगरे, संजय खाडे ,मारेगाव तालुक्यातील अरुणा खंडाळकर, आशिष खुलसंगे, सह बहुतांश जणांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती आहे.
अनेकांना लागले आमदारकीचे डोहाळे ?
प्रत्येक जण वरिष्ठांकडे वर्णी लावतांना दिसत आहे. आता सर्व उमेदवारांचे अर्ज घेऊन जिल्हाध्यक्ष पक्ष श्रेष्टींकडे सादर करणार. आणि महाविकास आघाडीची वणी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे सुद्धा महत्वाचे आहे. सध्यातरी माजी आमदार वामनराव कासावार, प्रदीप बोनगिरवार ,प्रा. टिकाराम कोंगरे, संजय खाडे हे चांगलेच शर्यतीत असल्याचे बघायला मिळते आहे. आता महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यावर वणीची जागा काँग्रेस पक्षाला सुटणार कि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार? यावर सर्व उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. सध्यातरी काँग्रेस पक्षातील इच्छुकांना आमदारकीचे चांगलेच डोहाळे लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.