-->

निधन वार्ता:- एक बहुआयामी व्यक्तिमत्व उत्कृष्ट असा कारपेंटर काळाच्या पडद्याआड.

0

 निधन वार्ता:- एक बहुआयामी व्यक्तिमत्व उत्कृष्ट असा कारपेंटर काळाच्या पडद्याआड.

वणी:-  विविध कलांमध्ये पारंगत असलेले पत्रकार डॉ विनोदकुमार आदे यांच्या वडिलांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दीर्घ आजाराने नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले आहे.A multifaceted personality, Carpenter excelled behind the scenes of time.

निधन वार्ता:- एक बहुआयामी व्यक्तिमत्व उत्कृष्ट असा कारपेंटर काळाच्या पडद्याआड.

पत्रकार डॉ विनोदकुमार आदे यांना पितृशोक.

      मारेगाव येथील सदाशिव बापुराव आदे वय वर्ष 65 यांना गेल्या सहा महिन्यांपासून रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांचा नागपूर येथील एम्स हास्पिटल मध्ये उपचार सुरू होता. त्यातून त्यांना आरामही मिळाला होता. त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या काही नियमांचे पालन सदाशिव आदे यांनी न केल्यामुळे त्यांना दोन दिवसा अगोदर  निमोनिया झाला. काल त्याची प्रकृती अचानक बिघडली परिणामी त्यांना सायंकाळी नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सदाशिव आदे यांचे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी शशिकला दोन मुले  डाॅ. विनोदकुमार व प्रफुल व दोन मुली जयमाला व सुषमा सुन मोनाली व रिना नातवंड परी व निर्वी, काव्या आणि ग्रंथा असा मोठा आप्तपरिवार आहे.
मा.विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

   एक बहुआयामी व्यक्तिमत्व उत्कृष्ट असा कारपेंटर हरविल्याने मारेगांव तसेच वणी परिसरात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर त्याच्या राहत्या घरी मारेगांव येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top