अखेर पोलीस पाटलांनी बांधले गावात तोरण.
वणी:- तालुक्यातील कोतवाल संघटनेने गावात पोळ्यानिमित तोरण बांधण्यावर बहिष्कार टाकल्याने प्रभारावर असलेल्या मूर्धोनी येथील पोलीस पाटलाने गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पळसोनी येथे जाऊन स्वतः तोरण बांधले आहे.Finally, the police team built a pylon in the village.
सध्या कोतवाल संघटनेच्या मागण्यांची शासनाने पूर्तता न केल्याने, कोतवाल संघटनेने पोळ्यानिमित गावात बांधण्यात येणाऱ्या तोरणावर बहिष्कार टाकला आहे. पळसोनी गावात पोलीस पाटलाचे पद रिक्त असल्याने येथील प्रभार लगतच्या मूर्धोनी येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे यांचेकडे सोपविण्यात आला आहे. पोळ्यानिमित पळसोनी गावात परंपरेनुसार तोरण बांधण्यासाठी पोलीस पाटील यांनी तेथील कोतवाल यांच्याशी संपर्क साधला असता गावात तोरण बांधण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले आहे.
परिणामी पोळ्यानिमित गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मूर्धोनी येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे यांनी स्वतः पुढाकार घेत पळसोनी येथे जाऊन गावात पोळ्या सणानिमित्त मानाचे तोरण बांधले आहे.