-->

जनमानसात रमून समाजकार्यात अग्रेसर असलेल्या कर्तबगार नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0

 जनमानसात रमून समाजकार्यात अग्रेसर असलेल्या कर्तबगार नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वणी:- गेल्या कित्येक वर्षांपासून वणी उपविभागातील अनेक गावातील गरजू लोकांना,सोबतच विद्यार्थ्यांना मदत,वृद्धांना दृष्टी देण्यासाठी डोळे तपासून चष्मे वाटप, सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य शिबीर, दिन दुबळ्यांना मदत, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम राबविणे,क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सामन्यांचे आयोजन करणे. राजकारण न करता समाजकार्याची आवड असणारे समाजसेवी नेतृत्व म्हणजेच मा. विजयबाबू चोरडिया!

आज ४ सप्टेंबर ला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मा.विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🎂💐 Happy birthday to the accomplished leader who is leading the social work in the mind of the people!

विजयबाबू चोरडिया यांचा थोडक्यात परिचय.


विजयबाबू यांचा थोडक्यात परिचय....

औषधीनिर्माणशास्त्राची पदवी अर्थात बी. फार्मची डिग्री विजयबाबूंनी मिळवली. शैक्षणिक आयुष्यातच त्यांचा राजकारण आणि समाजकारणात प्रवेश झाला. 

एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती दूर करण्यात त्यांची हातोटी आहे. आजोबा प्रेमराजजी चोरडिया हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. सन १९३२ ला महात्मा गांधी वणीला आले होते. तेव्हा प्रेमराजजी यांना त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. ते वणी नगरपालिकेचे उपाध्यक्षही राहिलेत. 

वडील पारसमलजी व्यापारी होते. त्यातही सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. या संस्कारांतून विजयबाबूंची जडणघडण होत राहिली. ते अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांना आजही कुणावर अत्याचार झाल्याचं सहन होत नाही. सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल अभ्यास करून ते एखादा प्रश्न उचलून धरतात. त्यावर तोडगा निघेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा करतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हा त्यांचा विशेष गुण. म्हणूनच वरिष्ठांपासून तर अगदी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते प्रिय आहेत. 

एरवी शांत आणि संयमी दिसणारे विजयबाबू अन्यायाविरुद्ध आक्रमक होतात. वणी परिसर कोळशाच्या खाणींनी व्याप्त आहे. इथं अनेक सामान्य कामगार आहेत. त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम विजयबाबू आजही करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्या संदर्भातलं निवेदनही त्यांनी दिलं होतं. 

कर्मयोगी गाडगेबाबांच्या दशसूत्रींवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यावर ते कामही करतात‌. दर उन्हाळ्यात व्यक्तिगत पातळीवर ते पाणपोई चालवतात. सामान्यजनांसाठी सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करतात. त्यांना वैयक्तिक पातळीवर भेटवस्तूदेखील देतात. स्थानिक जैताई मंदिर परिसरात त्यांनी स्वखर्चाने स्वच्छतागृह बांधून दिलं. 

एखादी समस्या त्यांच्या नजरेत येताच ते लगेच निवारण करतात.त्यांचा राजकारणातला प्रवेश तसा अपघातानंच झाला होता. शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीपत्रावर थोरल्या भावाऐवजी त्यांचं नाव चुकून आलं. ही जबाबदारीदेखील त्यांनी समर्थपणे सांभाळली. श्रीकृष्ण जन्माष्टमी चारिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अत्यंत नियोजनबद्ध असा जन्मोत्सव त्यांच्या नेतृत्वात साजरा होतो.सन २००० मध्ये ते जेसीजसोबत जुळलेत. पुढं दोनच वर्षांत त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. सन २००४ मध्ये भारतीय जैन संघटनेचे ते अध्यक्ष झालेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कोलवॉशरी वर्कर्स युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष, रामलाठी आखाड्याचे सल्लागार, बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक, अशी अनेक पदं त्यांनी भूषवलीत. 

सन २०१६ मध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पुढं प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. शिक्षण, व्यवसाय, राजकारण आणि समाजकारण या सर्वच क्षेत्रात ते अगदी सर्वोत्तम आहेत.


वणी परिसरातील आरोग्याच्या समस्यांसंदर्भात ते अत्यंत गंभीर होतात. त्यावर प्रत्यक्ष कृतीदेखील करतात. अनेक आरोग्य शिबिरांचं ते नियमित आयोजन करतात. रुग्णांच्या निवास, भोजन, उपचार आणि औषधींचा खर्च देखील करतात. अपंगांना तीन चाकी सायकल, कर्णबधिरांना कानाच्या मशीनचं वाटप करतात. ते आजही मोठ्या ऑपरेशनसाठी गरजूंना मदत करतात. कोरोना कालखंडात त्यांनी अनेकांना भरभरून मदत केली. कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. त्यांना आर्थिक मदतही केली.

विजयबाबू बहुआयामी आहेत. बुद्धिबळ आणि क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ. आता कामाचा व्याप वाढल्यामुळं त्यांना यासाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. तरीदेखील वाचन आणि संगीत ऐकण्याचा छंद त्यांनी अजूनही जोपासला आहे. ज्ञानी आणि गुणीजनांची ते मुक्तकंठण प्रशंसा करतात. 

वर्षभर काही ना काही उपक्रम ते राबवतच असतात. कामगार आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर ते खंत व्यक्त करतात. 

जैताई देवस्थान, रंगनाथ स्वामी मंदिर, डॉ. आंबेडकर चौकातील दुर्गा मंदिर, जंगलाचा मारुती मंदिर, अमृत भवन हनुमान मंदिर, कोलगाव येथील संत जगन्नाथ महाराज मंदिर यांना त्यांनी भरीव मदत केली. भांदेवाडा येथील संत जगन्नाथ महाराजांच्या दमणीसाठी त्यांनी २२ किलो चांदी अर्पण केली. वंदे भारत कार्यक्रम असो की तिरंगा रॅली यात ते अग्रेसर असतात. 

त्यांनी आतापर्यंत तीनशे ५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. अनोळखी बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात ते आजही पुढाकार घेतात. 

पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी एनडीआरएफची चमू वणीला आली होती. त्याची पूर्ण व्यवस्था विजयबाबूंनी केली. राजकारणात राहूनही त्यांनी नैतिकता जपली. त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये देखील त्यांचे स्थान आदराचेच आहे‌. तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी हा त्यांचा जन्मदिवस. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला निष्काम कर्मयोग ते आजही सांभाळतात. गीतेचं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा सदैव प्रयत्न करतात. सर्वांना सोबत घेऊन कार्य करतात. ४ सप्टेंबरला  त्यांचा जन्मदिवस यानिमित्ताने विजयबाबू यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि भविष्यातील उज्ज्वल कारकीर्दीसाठी खूप खूप सदिच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top