राजूर कॉलरी येथे भगतसिंग जयंती साजरी
राजूर कॉलरी: देशाला निव्वळ इंग्रजांपासून स्वातंत्र्यच नाही तर या देशाला शोषण विरहित समाजव्यवस्था असलेली समाजवादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ह्या साठी लढा देत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सातत्याने वृत्तपत्रात लिखाण करणे, रॅली चे आयोजन करणे , जातीभेद नष्ट करण्यासाठी वर्ग जागृती करणे , युवकांचे संघटन बांधणे, त्यांना संघर्षासाठी तयार करणे आदी कार्ये भगतसिंग वयाचा २० व्या वर्षी करीत होते. हे सर्व करीत असताना त्यांना इंग्रजांनी पकडून वयाचा २३ व्या वर्षी फासावर लटकाविले. अश्या या महान शहीद ए आझम भगतसिंग ह्यांची जयंती दिनांक २८ सप्टेंबर ला राजूर येथील शहीद भगतसिंग चौकात साजरी करण्यात आली. Bhagat Singh Jayanti celebrations at Rajur colliery
प्रसंगी शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा प्रतिमेला गावातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाला कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. नंदकिशोर लोहकरे, प्रीतम हनुमंते, विनोद इंगळे,आशिष पाटील, चैलेश आरमोरिकर, अमर चीटपल्लिवार, स्वप्नील हस्ते, माणिक खैरे, पप्पू भगत, भोला दाढे, लड्डू दुर्गमवार, पोयाम , राजू हिकरे, मास्टर हीकरे आदी गावातील तरुण उपस्थित होते.