धक्कादायक :- गर्भवती नवविवाहित प्रेमविवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या.
वणी:-
मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या २१ वर्षीय नवविवाहित तरूणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याचे समजतंय.Shocking :- Suicide of a pregnant newly married girl.
वणी तालुक्यातील परसोडा येथील पायल चा प्रेमविवाह झाला होता. अगदी काहीच महिने संसार नीट होता. अचानक दाम्पत्यात काही अडचण आली की काय?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
पायल गौरव उरकुडे वय २१ वर्ष
पोलीस स्टेशन मुकुटबन हद्दीत असलेल्या परसोडा गावात असलेल्या गौरव उरकुडे या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर सुखाने संसार करीत असतानाच पायल गौरव उरकुडे नी घरी कोणीही नसतांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला पायल चा नुकताच काही महिन्या अगोदर गौरव उरकुडे सोबत प्रेम विवाह झाला होता. लग्नाचे काही महिने ओलांडताच पायल सात महिन्यांची गरोदर राहली आणि सोमवारी सकाळी जवळपास ११/१२ वाजताचे सुमारास घरी कोणीही नसल्याचे बघून पायल ने घरी गळफास घेतला. यात पायल मृत अवस्थेत दिसली. लागलीच ग्रामस्थांनी पोलीस ठाणे मुकुटंबन ला फोन करून माहिती दिली.
या संदर्भात नातेवाईकांनी मुकुटबन पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करून पायल चे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले सदर मॄतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे