-->

आ.गायकवाड, खासदार बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी.

0


आ.गायकवाड, खासदार बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी.


वणी:- तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकसभा विधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल विरोधी पक्षातील नेत्याकडून केल्या जात असलेल्या अपप्रचार व अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध करीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत बेताल वक्तव्य करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. Congress demand to file a case against MLA Gaikwad MP Bonde.

आ.गायकवाड, खासदार बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी.

गेल्या काही दिवसात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांनी जीभ छाटण्याची भाषा करीत जणू धमकीच दिली होती. त्या बेताल वक्तव्याचे परिणाम संपूर्ण देशात पडले आहे. विविध ठिकाणी या आमदार व खासदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणी तालुका काँग्रेस कमिटीने शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. 
 प्रसंगी वणी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष घनश्यामजी पावडे, प्राध्यापक टिकाराम कोंगरे,रवी देठे, डॉक्टर मोरेश्वर पावडे ,ओम ठाकूर ,उपरे ,अशोक पांडे, कोरडे साहेब ,सुधीर खंडाळकर मंगल मडावी सुरेश काकडे ,विवेक मांडवकर ,वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष कुलसंगे, राजू कासावार, राजेंद्र कोरडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top