वारी प्रबोधनाची :-आदर्श ग्राम निर्मितीची,राष्ट्रसंतांच्या विचारांची.
वणी:- भद्रावती तालुक्यातील एकशे पाच व वरोरा तालुक्यातील एकशे३७ असा एकूण दोनशे ४२ गावांशी संवाद साधला गेल्या नंतर ही वारी आता वणी तालुक्यात देखील फिरणार आहे. यासाठी शनिवार तारीख २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्राम गृहात सर्व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या उपासकांची बैठक आयोजित केली आहे. यासाठी सर्व श्रीगुरुदेव सेवा मंडळ व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Wari Enlightenment :- Ideal Village Creation, Nation's Thoughts.वारी प्रबोधनाची या वारीचा उद्देश..
बंद झालेल्या प्रार्थना पूर्ववत सुरू करण्यात आल्या, नवीन मंडळ स्थापन करण्यात यावे. असे रचनाबद्ध कार्य व गावाचे प्रबोधन करीत हि वारी आता वणी तालुक्यात (यवतमाळ जिल्हा) दाखल होणार आहे.
वारीच्या नियोजनाकरिता सदर बैठकीचे आयोजन दिनांक २१ सप्टेंबर ला दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह वणी येथे करण्यात आलेले आहे.
आपण स्वतः व आपल्या संपर्कातील लोकांना सांगून वणी तालुक्यातील वारीला यशस्वी करण्याकरिता योगदान द्यावे अशी विनंती. आयोजकांनी केली आहे.

.jpg)