कलावंत सदाशिव आदे यांना श्रध्दांजली!
वणी :- उपविभागातील सुप्रसिद्ध काष्टशिल्पकार तसेच कारपेंटर यांचे ३ संप्टेबरला उपराजधानितील एम्स हास्पिटल येथे उपचार दरम्यान कलावंत सदाशिव बापुराव आदे यांचे निधन झाले होते. त्यांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम बदकी भवन मारेगाव येथे घेण्यात आला होता.Tribute to artist Sadashiv Ade
या कार्यक्रमाला महाराष्ट्र भुषन पुरस्कार प्राप्त श्री संत खेमराज महाराज, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडीया, कापुस पनन महासंघ महाराष्ट्र राज्य चे संचालक संजय खाडे, मारेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ, मारेगांवचे तहसिलदार उत्तम निलावाड,नायब तहसीलदार,प्रतिक बोर्डे, यवतमाळचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक वसंत कनाके, सुप्रसिद्ध जेष्ठ नाट्यकलावंत अशोक सोनटक्के, जेष्ट कवी धनराज मेश्राम, वणी उपविभागातील सुप्रसिद्ध डाॅक्टर श्रीकांत भगत, नगर पंचायत सदस्य आकाश बदकी, कम्युनिस्ट पार्टीचे बंडू गोल्लर, धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास बोबडे,सह उपविभागातील राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते, आदींनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

.jpg)