-->

प्रगतीनगर दरोडा कटातील पाच जण जेरबंद

0

 प्रगतीनगर दरोडा कटातील पाच जण जेरबंद

वणी:-शहरातील प्रगतीनगर भागातील व्यावसायिकांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असलेले पाच संशयित पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र यातील म्होरक्या बाहेर असल्याची चर्चा सध्या शहरात जोमात सुरू आहे.  मग तो म्होरक्या कोण? आणि त्याला पाठबळ कोण देतंय हा प्रश्न अनुत्तरित आहे.Five people in Pragatinagar robbery conspiracy jailed

प्रगतीनगर दरोडा कटातील पाच जण जेरबंद

    वरोरा मार्गावरील प्रगती नगर भागात सुभाष शंकरराव डोरलीकर यांचे घर आहे. ४ सप्टेंबर ला डोरलीकर कुटुंब जेवण करून गाढ झोपले होते. त्याच रात्री अडीच वाजताचे सुमारास चारचाकी वाहनाने काही लोक आले. अन घरात शिरले.  घरात शिरल्यानंतर दार,खिडक्या व इतर वस्तूचा काहीसा आवाज आला. परिणामी डोरलीकर यांची मुलगी जागी झाली. तितक्याच तिला काही अनोळखी लोक दृष्टीस पडले. तिने घरातील कुटुंबातील सदस्यांना आवाज दिला असता दरोडा टाकण्यासाठी आलेले लोक पळून गेले, दरम्यान परिसरातील लोक जागे झाले. तरुण मुले सुद्धा शोध घेऊ लागली होती. तोपर्यंत चोरटे चारचाकी वाहनाने पसार झाले होते.

     या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ बघून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले अन धागा गवसला. 

दरोड्यातील चोरट्यांना वणीची किनार..

सुभाष डोरलीकर यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी आलेले लोक हे वणीतील काही जणांच्या जवळीक असल्याचे पोलिसांना लक्षात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पोलीस पथके रवाना केली. पोलीस तपासात असतांना जालना परिसरात गुन्ह्यात वापरलेले वाहन बेवारस स्थितीत पोलिसांना आढळले. परिणामी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे वणी पोलिसांनी  जालना व वसमत येथून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता इतरही पोलिसांच्या रडारवर आलेत. यात समंदरसिंग उर्फ बबलू रामसिंग टाक रा. गोकुळ नगर वणी, मुकिंदसिंग निक्कासिंग टाक, सावनसिंग मुकिंदसिंग टाक दोघेही रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना, सतनामसिंग गुरुमुखसिंग चव्हाण (३६) रा. वसमत तथा एक महिला रा. वणी यांना ताब्यात घेतले. यावरूनच सदर महिलेचे वणीत संबंध कोणाशी? तिला योजना आखून देणारा कोण? याबाबत गुप्तता पाळली असल्याचे समजते. एकूणच सदर दरोड्याच्या कटाला वणीची किनार तर नाही ना? असे प्रश्न उपस्थित होते आहे.      याआधी लालगुडा परिसरात दरोडा टाकण्यात आला होता. त्या प्रकरणाचा अद्याप छडा लावण्यात वणी ठाणेदार सपशेल अपयशी ठरले होते.     राजकीय पाठबळ आणि नेत्यांचे फोन यावरच गृहखाते चाललेय की काय?असे प्रश्न आवर्जून उपस्थित होते आहे. रात्री दरोडे,चोऱ्या होत असल्याने सर्व सामान्य जनतेची सुरक्षितता ऐरणीवर आल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. सदर घटनेचा तपास पोलिसांनी पारदर्शक केला तर मास्टर माईंड पोलिसांच्या जाळ्यात असेल हे सुद्धा खरे आहे.  ती महिला अन भाऊ, त्यांच्या सोबतीला कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहे. सदर महिलेचे कोणाशी संबंध होते,दरोडा टाकण्याचा उद्देश काय? अन डोरलीकर यांच्या घरी घरकामाला असलेला व्यक्ती कोण? याच आधारावर पुढील कडी जुळणार हे निश्चित आहे. मात्र पैशात रंगलेला रंगीला सध्यातरी दहशतीच्या वातावरणात असल्याची दबक्या आवाजात कुजबुज ऐकायला मिळाली हे मात्र खरे आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top