दोन दिवस वांजरी मार्गावरील रेल्वे फाटक बंद..
वणी:- वांजरी मार्गावरील रेल्वेच्या पटरीचे नूतनीकरण करण्याचे व डागडुजी चे काम करण्यात येणार असल्याने १३ सप्टेंबर ला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व १४ सप्टेंबर ला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वणी,वांजरी,नांदेपेरा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.Railway gate closed on Wanjari Marg for two days..
या मार्गावरील शाळेत जाणारे व वाहतूक करणारे वाहने वणी बायपास मार्गाने वळविण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाने संबंधित विभाग, एसटी ,शाळा व इतर विभागांना पत्राद्वारे कळविले आहे. दोन दिवस नांदेपेरा मार्ग बंद राहणार असल्याने चिखलगाव, वरोरा मार्गावर वाहतुकीची वर्दळ असणार आहे.

.jpg)