-->

धक्कादायक.. शेतात खेळत असलेला सहा वर्षीय बालक बेपत्ता.

0

 धक्कादायक.. शेतात खेळत असलेला सहा वर्षीय बालक बेपत्ता.

वणी:- वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोनूर्ली येथील शेतात खेळत असलेला सहा वर्षीय बालक बेपत्ता झाल्याची घटना ८ सप्टेंबर(रविवार)ला दुपारी तीन वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. तूर्तास पोलीस बेपत्ता बालकाचा शोध घेत आहेत.Shocking.. Six-year-old boy missing while playing in the field.

धक्कादायक.. शेतात खेळत असलेला सहा वर्षीय बालक बेपत्ता.

     केळापूर तालुक्यातील सोनूर्ली येथील संजय मारोती बोरेकर वय ३२ व पत्नी किरण हे रविवारी सकाळी दहा वाजता सहा वर्षीय रुद्रा व तीन वर्षीय स्वराज या दोघांना सोबत घेऊन शेतात निंदन करण्यासाठी आले होते. संजय व किरण कपाशीत निंदन करीत होते. तर बाजूलाच रुद्रा व स्वराज खेळत होते.  दुपारी अडीच वाजताचे सुमारास जेवण करण्यासाठी बसले चौघांनी एकत्र जेवण केले व संजय व किरण हे दोघेही कामाला लागले. दरम्यान दोन्ही मुले  त्यांच्या मागे खेळायला लागली.  दुपारी तीन वाजताचे सुमारास तीन वर्षीय लहान मुलगा स्वराज आईवडिलांकडे आला. मात्र रुद्रा कुठे दिसेना. दोघांनीही स्वराज ला विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काहीच सांगता येत नसल्याने संजय व किरण यांनी शोधाशोध सुरू केली. सायंकाळ पर्यत शोध घेतला मात्र रुद्राचा थांगपत्ता कुठेच लागला नाही. शेवटी सायंकाळी साडेसहा वाजता गावात येऊन सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी लगेच वडकी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती देताच वडकी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.  मात्र रुद्रा चा शोध लागला नाही. यावरून रुद्राचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

 

 वर्णन :- , वय ०६ वर्ष, अंगात हाफ बाहयांचे कथ्या रंगाचे टी शर्ट घातलेला व उजव्या पायात काळा धागा बांधलेला. वर्ण गोरा. सडपातळ. उंची अं ३ फुट असलेला रुद्रा(मुलगा).


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top