-->

या तारखेपासून होणार,पावसाचा जोर कमी.

0


या तारखेपासून होणार,पावसाचा जोर कमी.


वणी:- सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विश्लेषक पंजाबराव डख यांच्या सांगण्यावरून लवकरच पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या तारखेपासून होणार,पावसाचा जोर कमी.



राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मध्यम ते अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सुद्धा झाले आहे. २१ तारखेपासून सुरू झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात जोर धरला आहे. याआधी पंजाबराव डख यांनी २१ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हाच अंदाज खरा ठरत राज्यातील काही भागात अतिवृष्टी सुद्धा झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चिंता भेडसावत होती. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या डिजिटल बुलेटिन मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच येत्या सात दिवसापर्यत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकणातील काही भाग,,मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी!


या काळात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने विशेषतः शेतकऱ्यांनी स्वतःची व पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. २ ऑक्टोबर पर्यत पावसाचा जोर असाच कायम राहील.असे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन बुलेटिन मध्ये सांगितले आहे. त्यानंतर तीव्रता कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top