दोन वर्षांपासून बंद असलेला चालबर्डी येथील ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू
वणी:- झरी जामनी तालुक्यातील चालबर्डी गावातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर गेल्या दोन वर्षांपासून बंद होते. ही बाब शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांना मिळताच, त्यांनी विद्युत महावितरण च्या अभियंत्यांशी चर्चा करून तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले आहे.The transformer at Chalbardi, which has been closed for two years, is now operational
चालबर्डी हे गाव तहसील पासून अगदी ३ किमी अंतरावर आहे. झरी येथे महावितरणचे तालुका मुख्य कार्यालय पण आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने ओलित करता येत नव्हते. येथील आदिवासी शेतकऱ्यांची आर्त हाक काही महावितरण पर्यत पोहोचत नव्हती, अचानक संजय देरकर शिवसेना (उ.बा.ठा.)वणी विधानसभा प्रमुख यांनी दि. २५ सप्टेंबर ला आदिवासी समाज बांधवाच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली. प्रसंगी गावातील लोकांनी आदर सत्कार केला. विविध समस्या ऐकून घेतल्या त्यात शेतीला पाणी देण्यासाठी लावलेला कृषी पंपाचा ट्रान्सफार्मर दोन वर्षापासून बंद असल्याची तक्रार शेतकरी करीत होते.

.jpg)