-->

चक्क! शेतमजुरी करणाऱ्या महिलेला एका खोलीचे विजेचे बिल २२ हजार चारशे.

0


चक्क! शेतमजुरी करणाऱ्या महिलेला एका खोलीचे विजेचे बिल २२ हजार चारशे.


वणी : सध्यातरी महावितरण च्या भोंगळ कारभाराने जनता आधीच त्रस्त झाली आहे. यातच झरी येथील एका खोलीत वास्तव्य करणाऱ्या शेतमजूर महिलेला विद्युत महावितरण कंपनी ने झटका देत चक्क २२ हजार चारशे रुपयांचे देयके दिले. परिणामी मोलमजुरी करणाऱ्या महिलेला तर झटकाच बसला. ही बाब शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांना माहीत पडताच त्यांनी सदर महिलेच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. व समस्या जाणून घेत विद्युत महावितरण च्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून महावितरण चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. Pretty much! 22 thousand four hundred electricity bill for one room for a woman who works in agriculture.

चक्क! शेतमजुरी करणाऱ्या महिलेला एका खोलीचे विजेचे बिल २२ हजार चारशे.



     झरी येथील मृतक कौशल्याबाई केवलदास कोडापे या एका लहानशा खोलीत संसार करणाऱ्या शेतमजूर आदिवासी महिलेच्या कुटुंबाला वीज महावितरण कंपनीने चक्क २२ हजार चारशे रुपये वीज वापर केल्याचे बिल पाठवले. इतके मोठे विज बिल बघून सदर कुटुंब घाबरले. त्यानंतर शेतमजुरी करणारे गरीब आदिवासी कोडापे यांनी प्रथम माथार्जून येथील सलीमभाई यांची भेट घेत, सदर बाब कथन केली. सलीमभाई यांनी तात्काळ शिवसेना(उ.बा.ठा.)पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचेशी संपर्क करून सदरची माहिती दिली. संजय देरकर यांनी झरी येथे जाऊन प्रत्यक्षात मोलमजुरी करणाऱ्या मृतक कौशल्याबई कोडापे यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. प्रत्यक्षात पाहणी केली असता एकाच खोलीचे घर छोट कुटुंब, काही दिवसांपूर्वी कौशल्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने तर मुलगा हृदय रोगाने मरण पावले. कुटुंबातील पालनकर्ता मुलगा ही गेला. सुनबाई मोल मजुरी करून घर चालवत आहे. बिल मात्र २२ हजार चारशे रुपये गरीब माणसाला घाबरवून टाकणार होत. संजय देरकर यांच्या माध्यमातून 'माझी विज, माझा अधिकार" या अभियान निमित्ताने विजेच्या अनेक समस्यासाठी लढा देऊन गोर गरीब जनतेसाठी न्याय देत आहे. सध्यातरी महावितरण ची विद्युत व्यवस्था पुरती कोलमडली असल्याने सामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा रोष देरकर यांनी व्यक्त केला आहे.

वीज वितरण व्यवस्था ढेपाळली.


संजय देरकर यांनी विज वितरण व्यवस्था ढेपाळली असून बिल आणि अधिभार व वापर याचा ताळमेळ बसत नाही. जनतेची मात्र सतत लुट सुरू आहे. असा आरोप त्यांनी भेटी दरम्यान केला. आपल्या बिलाची दुरूस्ती त्वरीत करून देण्यासाठी संबधितांना नाहक त्रास देऊ नये असा सज्जड दम ही अधिकाऱ्यांना दिला. यावेळी संतोष माहूरे, सतिश आदेवार, हमजद शेख, शब्बीरभाई, राजू लडके आदी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top