पोळ्याच्या पाडवाच तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
वणी:- एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे सुलतानी संकट या विवंचनेत शेतकरी राजा दिवस काढीत आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच आहे. अशातच पठारपूर(कायर) येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऐन बडग्याच्या दिवशी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३ सप्टेंबर ला सायंकाळी सहा वाजताचे सुमारास घडली आहे.The young farmer met his death when the beehive collapsed.
तालुक्यातील पठारपूर येथील सुनील भाऊराव उलमाले या तरुण शेतकऱ्याकडे स्वतःची चार एकर जमीन आहे. त्याला जोड म्हणून त्याने दुसऱ्याची काही जमीन ठेक्याने करून तो उत्पन्न काढत होता. बडग्याच्या दिवशी सुनील ने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सुनील ला लगतच असलेल्या कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र सुनीलची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुनील ला मृत घोषित केले. सुनील ने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे सध्यातरी अनुत्तरित आहे. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.
सद्यस्थितीत शेतमालाला शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सरकार बाहेर देशातील सोयाबीन आयात करीत असल्याने सध्या सोयाबीन तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे खते,बियाणे,कीटकनाशकयांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. याचं विवंचनेत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे दिसून येते आहे.

