-->

वणी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ थांबवा. संभाजी ब्रिगेड

0

 वणी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ थांबवा. संभाजी ब्रिगेड


वणी :- उपविभागातील अनेक खाणीतून गौण खनिज संपत्तीचे अवैध उत्खनन केल्या जात आहे. परिणामी शासनाच्या गौण खनिज संपत्तीचा ऱ्हास होतो आहे. सदर गौण खनिज संपत्तीची  डोळ्यादेखत तस्करी होत असताना याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. सदरचे अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतूक तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड ने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.Immediately stop illegal minor mineral mining in Wani sub-division. Sambhaji Brigade

वणी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ थांबवा. संभाजी ब्रिगेड


वणी उपविभागातील वागदरा (नवीन),रासा,मोहदा, वांजरी, नरसाळा येथून मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेटच परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम उत्खननाचा हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून सर्रास व राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसुल बुडत आहे. वागदरा (नविन), मोहदा, रासा, वांजरी अश्या ठिकाणी वणी विभागातील अनेकगावात मागील काही वर्षापासून मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरु आहे. याबाबत संबंधीत विभागाकडे अनेकदा संभाजी ब्रिगेड व त्या परिसरातील नागरीकांनी तक्रारी सुद्धा केल्या परंतु सबंधीत अधिकारी व कर्मचारी अवैद्य उत्खनन व वाहतुक करण्यास जाणिवपुर्वक साहाय केल्यामुळे Willful and persistant negligence of डयुटी कर्त्यव्यात जाणिवपुर्वक व सतत कसुर करणे, Incompetence अकार्यक्षमपणा दाखवतात. परिणामी नैसर्गिक टेकड्या व सरकारी ई क्लास जमिनी पोखरून जेसीबी मशीनने परवानगी नसतांना सुद्धा ५० फुट खोली पर्यंत उत्खनन केले आहे. या सर्व प्रकाराला महसुल, आर.टी.ओ., वाहतुक व पोलीस प्रशासनाचा मोठा वरदहस्त लाभला आहे.  

     या तस्करीतून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या खिशात जातो. परिणामी संबधीत विभागात कोणी लेखी किंवा मौखिक तक्रार केल्यास तात्पुरती कार्यवाही करून हजारो ब्रास अवैद्य मुरूमाचे उत्खनन आढळून आल्यास केवळ २५ ते ५० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आल्याची नोंद केल्या जाते. ही थातुरमातूर कारवाही न करता सदर उत्खननाचे निरीक्षण जबाबदार आधिकारी व गावातील लोकप्रतिनीधी याच्या समक्ष इ.टि.एस. मशिनद्वारे मोजमाप व मुल्याकंन करून, 'महाराष्ट्र जमिन महसुल सहिता १९६६ कलम ४८ (७)' नुसार, गौनखणिजाचा बाजारभाव मुल्याच्या पाच पट दंड आकरण्यात यावा व 'कलम ४८ (८)' नुसार उत्खननामध्ये उपसण्यासाठी साधनसामग्री आढळली आहे ती जप्त करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.


संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

अवैध गौण खनिज उत्खनन करण्यासाठी या सर्व प्रकाराला पाठबळ देणाऱ्या संबंधीत विभागातील अधीकारी व कर्मच्याऱ्यांवर योग्य ती कारवाही करावी. अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात या सर्व प्रकारावर आळा घालण्यात आला नाही किंवा कारवाई करण्यात आली नाही तर आपणही या सर्व प्रकाराला पाठिंबा देत असल्याचे समजून संभाजी ब्रिगेड च्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून यातून उद्भवणाऱ्या शांतता आणि सुव्यवस्थेला आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, असा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, ऍड. अमोल टोंगे, खालीलभाई शेख, दत्ता डोहे,आशिष रिंगोले व सहकाऱ्यांनी दिला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top