टाकळी(कुंभा) येथील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात(उबाठा) जम्बो प्रवेश.
वणी :- मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यात तरुण,पुरुष,महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.Jumbo entry of hundreds of villagers from Takli (Kumbha) into Shiv Sena party (Ubatha).
वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनतेचा कल शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाकडे वळला आहे. भगव्या सप्ताहाचे औचित्य साधून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे उपस्थितीत वणी,झरी मारेगाव तालुक्यातील तरुणांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. गुरुवार( ५ सप्टेंबरला) मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) या गावात भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी युवा वर्गासह महिला, पुरुष व गावातील शेकडो ग्रामस्थांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेशी नाळ जोडत संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गावातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले.
शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त शिवसेनेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. पक्ष बांधणी व पक्ष संघटन बळकट करण्याचाही या सप्ताहातून संकल्प करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्रात पक्षबळ वाढविण्याकरिता शिवसेनेकडून गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गावागावात शिवसेना पोहचविण्यावर भर दिला आहे.. शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व निष्ठावंतांची एकजूट करीत त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाची मोट बांधली आहे. कार्यकर्तेही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकजूट होऊ लागले आहेत. मारेगाव तालुक्यातील टाकळी(कुंभा) येथील जम्बो पक्ष प्रवेशाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
तरुणांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग
या पक्ष प्रवेश सोहळ्यात टाकळी येथील सरपंच प्रमीला आदेवार, बेबी खेवले यांच्यासह पुरुषोत्तम डाहुले, मोरेश्वर राऊत, दिनेश डाखरे, छत्रपती डाहुले, दीलीपराव काकडे, गुलाबराव ठोंबरे, देविदास काकडे, गौतम पोंगळे, बिजाराम मंगाम, राजू आदेवार, सुनील सराटे, भालचंद्र गेडाम, अरविंद डाहुले, शंकर देशमुख, कल येवले, गणेश परचाके, प्रवीण सोनटक्के, देवेंद्र देवतळे, अशोक डाहुले, गिरमाजी क्षीरसागर, अर्चना निवलकर, सुवर्णा डाहुले, संगीता काकडे, शालिनी ठावरी, कल्पना जुमनाके, अश्विनी झाडे, जया पाल, सुप्रिया मडावी, उषा सोनटक्के, किरण मडावी, कविता क्षीरसागर, भद्रा सिडाम, दर्शना चौधरी, कौसाबाई काकडे, रत्नमाला शेळके, पुष्पाबाई कुडमेथे, बेबीबाई चौधरी, वंदना सिडाम तथा गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रसंगी पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख दीपक कोकास,किरण देरकर,सुरेखा ढेंगळे,वेणु झोडे, मस्की साहेब,आदी शिवेसना(उ.बा.ठा.) पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याच बरोबर वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या पक्ष प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

%20(2).jpg)
.jpg)