-->

तरुणांनो, बौद्धिक,आर्थिक, मानसिक स्वावलंबी व्हा. प्रा. डॉ. करमसिंग राजपूत

0

 तरुणांनो, बौद्धिक,आर्थिक, मानसिक स्वावलंबी व्हा. प्रा. डॉ. करमसिंग राजपूत

वणी:-

राष्ट्राच्या उन्नत जडणघडणीकरिता तरुणांनो, बौद्धिक,आर्थिक, मानसिक स्वावलंबी व्हा, असे परखड प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.करमसिंग राजपूत यांनी केले. ते मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापन दिन सोहळ्यात मराठा सेवा संघाची भविष्यवेधी वाटचाल याविषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. Young people, be intellectual, financial, mental self -reliant. Pvt. Dr. Karam Singh Rajput

मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न 

प्रसंगी त्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक स्वास्थ्य ,मानसिक स्वास्थ्य,चरित्र विकास,नातेसंबंधातील जपणूक, शैक्षणिक व व्यावसायिक विकास, कौशल्य विकास,

आणि सामाजिक योगदान या सात पैलूवर प्रकाश टाकला. मागील तीस-बत्तीस वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने रुजवलेले अनेक संस्कार, विचार आणि नव्याने निर्माण केलेल्या प्रथा -परंपरा आज समाजाने मनापासून स्विकारल्या असल्याबाबत ते म्हणाले.

याप्रसंगी शिक्षण,उद्योग,क्रीडा, राजकारण अशा अनेकविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष संजय खाडे,ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक संजय निमकर, युवा चेतना क्लबचे प्रमुख प्रा. दिलीप मालेकर, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक वैभव ठाकरे, चिकणकर डेकोरेशनचे संचालक विराज चिकनकर यांचा शाल,सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तीनी यावेळी मराठा सेवा संघाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आणि वर्धापन दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब राजूरकर, विधी सल्लागार ऍड.अमोल टोंगे, विभागीय उपाध्यक्ष इंजि.अनंत मांडवकर,मराठा आरोग्य कक्षाचे प्रमुख अरुण डवरे हे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती जिवतोडे, प्रास्ताविक मंगेश खामनकर, जिजाऊ वंदना सरिता घागे, किरण गोडे आणि आभार प्रदर्शन जीवन सूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोबडे, वसंत थेटे, कृष्णदेव विधाते, आशिष रिंगोले, सुरेंद्र घागे, विवेक गाडगे, भास्कर दुमोरे, जीवन सूर, भाऊसाहेब आसुटकर, शुभम कडू, संजय जेऊरकर, तुलसीदास पवार यांनी परिश्रम घेतले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top