वणीतील बँक व पतसंस्था यांना वाहतूक विभागाचे पाठबळ

0


वणीतील बँक व पतसंस्था यांना वाहतूक विभागाचे पाठबळ.


वणी:- शहरात अनेक बँक व पतसंस्था आहेत. मात्र या संस्थांनी वाहतूक कोंडी करून ठेवली आहे. याकडे जिल्हा वाहतूक प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदन युवासेना(उ.बा.ठा) ने नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे..Transport department support to banks and credit institutions in Wani
फिक्स आमदाराच्या दोन्ही पतसंस्था अगदी रस्त्यावरच!?



वणी शहरातील राष्ट्रीयीकृत बँक, नेत्यांच्या पतसंस्था अगदी मुख्य मार्गावर आहेत. यात महत्वाचे म्हणजेच, स्टेट बँक, लागताच असलेली फिक्स आमदार, महाराष्ट्र बँक,व गांधी चौकातील।बँक व पतसंस्था आदींचा समावेश आहे.

शहरातील राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांना पार्किंगची व्यवस्थाच नाही. शहरातील जवळपास सर्वच शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरातील प्रमुख रहदारीच्या मार्गावर आहेत. याठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यांवरच वाहने पार्क करून तासंतास बँकेचे व्यवहार करतात. परिणामी रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. रस्त्यांवर दररोज वाहनांचा जॅम लागत आहे. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था करून देण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. त्यामुळे नगर पालिकेने यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक विभागही वाहन धारकांना शिस्त लावण्यास अपयशी ठरत आहे. बँकेसमोर वाहने शिस्तीत उभे करण्यास सांगणारा कोणताही चौकीदार अथवा कर्मचारी रस्त्यावर उभा राहतांना दिसत नाही. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था वाहतूक कोंडीचे कारण बनू लागल्या आहेत. त्यामुळे नगर पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या अथवा बँकांना तशा सूचना ददिल्या तर सामान्य जनता सुखरूप होईल.


सध्या सण उत्सवाचा काळ सुरु आहे. नवरात्र उत्सव काही दिवसांवरच आला आहे. नंतर दिवाळीसारखा मोठा सण आहे. या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. नवरात्र उत्सवात भाविकांची रस्त्यांवर मोठी गर्दी उसळलेली असते. रस्ते गर्दीने फुलून निघतात. तेंव्हा रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची नगर पालिकेने दक्षता घ्यावी. त्यातच दिवाळी सारखा महत्वाचा सण ही तोंडावर आला आहे. दिवाळीच्या खरेदीकरिता नागरिकांची शहरात एकच झुंबड उडतांना दिसते आहे. गावखेड्यातील ही नागरिक शहराच्या ठिकाणी खरेदीला येतात. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. तेंव्हा बँकेपुढे नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली वाहने वाहतूक कोंडीला जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे नगर पालिकेने रस्त्यांवर असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापकांना पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगावे अथवा पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या. पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरात चालविण्यास परवानगी देऊ नये, शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर पार्किंग व्यवस्था नसताना रस्त्यावर वाहने उभी करण्यास भाग पडणाऱ्या या बँकांवर दंडात्मक कारवाईची करावी आणि याकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यास युवासेने कडुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याला सर्वस्वी नगर पालिका जबाबदार राहील.
     असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून दिला आहे.

शहरातील राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांना पार्किंगची व्यवस्थाच नाही. शहरातील जवळपास सर्वच शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरातील प्रमुख रहदारीच्या मार्गावर आहेत. याठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यांवरच वाहने पार्क करून तासंतास बँकेचे व्यवहार करतात. त्यामुळे रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. रस्त्यांवर दररोज वाहनांचा जाम लागत आहे. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था करून देण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. त्यामुळे नगर पालिकेने यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक विभागही वाहन धारकांना शिस्त लावण्यास अपयशी ठरत आहे. बँकेसमोर वाहने शिस्तीत उभे करण्यास सांगणारा कोणताही चौकीदार अथवा कर्मचारी रस्त्यावर उभा राहतांना दिसत नाही. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था वाहतूक कोंडीचे कारण बनू लागल्या आहेत. त्यामुळे नगर पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या अथवा बँकांना तशा सूचना द्याव्या.
      सध्या उत्सवाचा काळ सुरु आहे. नवरात्र उत्सव काही दिवसांवरच आला आहे. नंतर दिवाळीसारखा मोठा सण आहे. या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. नवरात्र उत्सवात भाविकांची रस्त्यांवर मोठी गर्दी उसळलेली असते. रस्ते गर्दीने फुलून निघतात. तेंव्हा रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची नगर पालिकेने दक्षता घ्यावी. त्यातच दिवाळी सारखा महत्वाचा सणही तोंडावर आला आहे. दिवाळीच्या खरेदीकरिता नागरिकांची शहरात एकच झुंबड उडतांना दिसते. गावखेड्यातील ही नागरिक शहराच्या ठिकाणी खरेदीला येतात. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. तेंव्हा बँकेपुढे नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली वाहने वाहतूक कोंडीला जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे नगर पालिकेने रस्त्यांवर असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापकांना पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगावे अथवा पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या. पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरात चालविण्यास परवानगी देऊ नये, शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर पार्किंग व्यवस्था नसताना रस्त्यावर वाहने उभी करण्यास भाग पडणाऱ्या या बँकांवर दंडात्मक कारवाईची करावी आणि याकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यास युवासेने कडुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याला सर्वस्वी नगर पालिका जबाबदार राहील. असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून दिला आहे. सुरेश शेंडे, तेजस नागपुरे,आर्या राऊत,बादल येसेकर, रुद्राक्ष सिदाम,चौधरी चैतन्य लोडे, नीकेश कडुकर, नीरज घागी, बदखल, मशिष मंदे आदी उपस्थित होते.

फिक्स आमदाराच्या दोन्ही पतसंस्था अगदी रस्त्यावरच!?

सध्या वणीत एकेकाळी एका वृत्तपत्राचा वार्ताहर असलेला नेता. पूर्व विदर्भातील एका लोकप्रतिनिधी मुळे प्रकाशझोतात आल्याचे बघायला मिळते आहे. सध्यातरी फिक्स आमदार म्हणून चर्चेत आला आहे. केवळ जातीपातीच्या राजकारणात वावरलेला स्वयंघोषित नेता इतक्या मोठ्या स्तरावर पोहचला की? त्याला सगळं हिरव्यागार जंगलात हिरवळ दिसते आहे. आणि या स्वयंघोषित नेत्यांच्या दोन्ही पतसंस्था मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आहेत. हे विषेश. मग वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांच्या दावणीला बांधले की,काय असा प्रश्न उपस्थित होते आहे.
    वेकोली,कामगार,पूर्वी एका गावचा सरपंच,अन एका मोठ्या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करणार नेता कोण? केवळ काळा पैसा पांढरा करणारा तो नव्हे ना!? आपणच ठरवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top