माजी पंचायत समिती सदस्याची उमेदवारीसाठी धडपड?
वणी:- पंचायत समितीचे राजूर गणातील माजी सदस्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. यातच त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड चालू केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. Struggle for candidacy of former Panchayat Samiti member?
वणी पंचायत समितीचे सदस्य डॅनी सँड्रावार यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी धडपड चालू केली आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी संपर्क सुद्धा वाढविले आहे. अनुसूचित जाती साठी राखीव असलेली चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठी, स्थानिक पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती, ख्रिश्चन, तेलगू मतदार बऱ्याच प्रमाणात असल्याने, डॅनी सँड्रावार यांनी चंद्रपूर मतदारसंघ निवडला असल्याची माहिती आहे. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांची बऱ्यापैकी ओळख आहे. परंतु या मतदारसंघात अनेक दिग्गज मैदानात असल्याने सँड्रावार यांनी सुरक्षित मतदारसंघ निवडला असल्याचे बोलले जात आहे. परिणामी सद्यस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. या मतदारसंघात अनेक दिग्गज सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्नात आहे. आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी स्थानिकांना प्राधान्य देणार की, तरुण नवख्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी बहाल करणार हे येत्या काही दिवसांत कळणार आहे.
वणीतील इच्छुकांना लागले आमदारकीचे वेध..
वणी विधानसभा मतदारसंघातील पुढाऱ्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. यातच काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोठया प्रमाणात अर्ज सादर केले आहे. यातील एका संभाव्य उमेदवाराने तर फिक्स आमदार म्हणून जणू गाजावाजा सुरू केला असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. दोन दिवसांपूर्वी येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ येथे मुलाखती दिल्या आहेत. यातील चार ते पाच संभाव्य उमेदवार तिकीट मिळविण्यासाठी कंबर कसून आहे. यातील एक पदाधिकारी लोकप्रतिनिधी च्या जोरावर "फिक्स आमदार" होणार असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळते आहे. आता तिकीट वाटप कोअर समिती करणार की, लोकप्रतिनिधी हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे? तूर्तास राजकारणात मुसद्दी असलेल्या पुढाऱ्यांपुढे फिक्स आमदाराचा टिकाव लागणार का? हे बघणे औतूसक्याचे आहे.

%20(1).jpg)