-->

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना वणी येथे आदरांजली

0


कॉम्रेड सिताराम येचुरी यांना वणी येथे आदरांजली

वणी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी खासदार कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे निधन दिनांक १२ सप्टेंबर २४ रोजी दिल्ली येथे उपचारादरम्यान झाले. त्यांना वणी येथील शेतकरी मंदिरामध्ये नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष ऍड.देविदास काळे, रंगनाथ स्वामीचे उपाध्यक्ष विवेक मांडवकर, वसंत जींनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, तालुका काँग्रेस कमिटीचे राजाभाऊ पाथरडकर, सीपीएमचे ऍड, कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड दिलीप परचाके, कॉ.मनोज काळे, सीपीआयचे धनंजय आंबटकर आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.Tribute to Comrade Sitaram Yechury at Wani 

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना वणी येथे आदरांजली

कॉम्रेड सिताराम येचुरी हे जे एन यू चे अध्यक्ष होते, ते विद्यार्थी दशेपासूनचं कम्युनिस्ट चळवळीमध्ये सहभागी झाले. विद्यार्थी असताना एसएफआय या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी चळवळीत सक्रिय रूपाने काम करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिशा देऊन प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. आणीबाणीच्या काळामध्ये विद्यार्थी दशेत त्यांना जेल भोगावे लागले. पुढे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सक्रिय झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिव या सर्वोच्य पदी त्यांची तीनदा निवड झाली. कॉम्रेड येचुरी हे पश्चिम बंगाल मधून दोनदा राज्यसभेचे सदस्य ही झाले. कॉम्रेड येचुरी यांनी राज्यसभेचे सदस्य असताना शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या विविध प्रश्नावर संसदेमध्ये आवाज उठवला. ते सतत शेतकरी आणि शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले, तसेच त्यांचा संविधानानुसार प्रचंड अभ्यास असल्याने संविधनिक प्रश्नावर सातत्याने सरकारला भंडावून सोडत असतं. कॉम्रेड येचुरी हे जागतिक कीर्तीचे कम्युनिस्ट होते. इंडिया आघाडीला आकार देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 'कॉम्रेड येचुरी यांच्या निधनाने डाव्या व पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे', असे प्रतिपादन ऍड. देविदास काळे यांनी शोकसभेत केले.
या शोकसभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, कॉम्रेड डॉ. श्रीकांत तांबेकर, रामभाऊ जिद्देवार, नंदू बोबडे, प्रीती करमणकर, शारदा ठाकरे, गजानन ताकसांडे, खुशाल सोयाम, किसन मोहूले, मनीषा गेडाम, सारिका दानव, कवडू चांदेकर, प्रकाश भोसले, सुधाकर सोनटक्के, शंकर गाउत्रे, सुभाष नांदेकर, अमोल चटप आदी व अनेक गावातील स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top