कीटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरड(नेरड) येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. A-young-farmer-committed-suicide-by-consuming-pesticides.
तालुक्यातील पुरड (नेरड ) येथील प्रवीण दिलीप खारकर हा हैद्राबाद येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर तो आईकडे गावाला आला. व वडिलोपार्जित शेती करू लागला. प्रवीण चा भाऊ गावातच वेगळा राहतो. शनिवारी सकाळी ९ वाजताचे सुमारास आईला शेतात जाऊन येतो असे सांगून घरून गेला. व काही वेळाने परत आला आणि घरातील खाटेवर येऊन झोपला. त्यानंतर आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता, प्रवीण च्या तोंडाला फेस आल्याचे दिसले. त्याच्या आईने लागलीच प्रवीण च्या काकाला हाक मारली. त्यानंतर त्याला उपचारासाठी कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी प्रवीण ला मृत घोषित केले.